Wedding Video Viral: माझ्यापेक्षा भारी पोरगी पटवून दाखव! एक्सच्या लग्नात पोहोचली तरुणी; एक्सप्रेशन एवढे खतरनाक की...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 03:21 PM2022-05-08T15:21:06+5:302022-05-08T15:21:42+5:30
Wedding Video Viral: इंटरनेटवर दररोज लग्नाचे बरेच मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Wedding Video Viral: इंटरनेटवर दररोज लग्नाचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडीओ मजेशीर असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या लग्नात गेल्याचे दिसत आहे. यावेळी आपल्या एक्सच्या होणाऱ्या बायकोला पाहून तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
एक्स गर्लफ्रेंड मुलाला भेटायला येते
व्हायरल व्हिडिओमध्ये वधू-वर स्टेजवर उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. जयमालाचा कार्यक्रम झाला आहे आणि त्या दोघांना भेटायला पाहुणे येत आहेत. दरम्यान, एक मुलगी वधू-वरांना भेटायला येते. तिच्या हातात एक भले-मोठे गिफ्टेदखील दिसते. वराला हे मोठे गिफ्ट पॅकेट देऊन ती स्टेजवरुन उतरते. यादरम्यान मुलीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे असतात.
दुःखी मनाने जाते तरुणी
आपण पाहू शकता की, त्या तरुणाची एक्स अतिशय दुःखी दिसत आहे आणि दुःखी मनाने मंचावरून खाली येते. मुलीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून समजू शकते की, तिच्या मनात काय भावना असतील. तिला परत जाताना पाहून वधूच्या चेहऱ्यावरचे भावही विचित्र व्हायला लागतात. हा व्हिडिओ निरंजन महापात्रा नावाच्या व्यक्तीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.