लॉकडाऊनमध्ये The Great Khali नेमका करतोय तरी काय? बघा त्याचे व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 11:05 IST2020-04-03T10:48:05+5:302020-04-03T11:05:44+5:30
खली कधी स्वयंपाक करताना दिसतोय तर कधी अंगणात शेती करताना. तसेच तो त्याच्या मुलांसोबत मस्ती करतानाही दिसतो आहे.

लॉकडाऊनमध्ये The Great Khali नेमका करतोय तरी काय? बघा त्याचे व्हिडीओ!
लॉकडाऊनमुळे देशभरातील लोक घरात आहेत. काही लोक ऑफिसचं काम करत आहेत तर काही लोक घरातील काम करत आहेत. अशात सेलिब्रिटी त्यांचे घरातील व्हिडीओ शेअर करत आहेत. यात WWE मधील रेसलर द खलीही मागे नाही. खली सध्या काय करतोय याचे वेगवेगळे व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
खली कधी स्वयंपाक करताना दिसतोय तर कधी अंगणात शेती करताना. तसेच तो त्याच्या मुलांसोबत मस्ती करतानाही दिसतो आहे.
एका व्हिडीओमध्ये खलीने देशातील लोकांना लॉकडाऊनचे नियम पाळण्याचे आवाहन केलं आहे. तो म्हणाला की, 'बाहेर अजिबात जाऊ नका. पंजाब पोलीस फ्रीमध्ये सेवा करत आहे'.