VIDEO : पदार्थांवर बसलेल्या माश्या तुम्ही पाहिल्या असतीलच? बघा त्यानंतर नेमकं काय होत!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 04:12 PM2024-01-19T16:12:51+5:302024-01-19T16:15:48+5:30

VIDEO : एका व्यक्तीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात दाखवण्यात आलंय की, माशी जेव्हा पदार्थावर बसते तेव्हा काय होतं.

What happens when fly lands on food reveals video | VIDEO : पदार्थांवर बसलेल्या माश्या तुम्ही पाहिल्या असतीलच? बघा त्यानंतर नेमकं काय होत!

VIDEO : पदार्थांवर बसलेल्या माश्या तुम्ही पाहिल्या असतीलच? बघा त्यानंतर नेमकं काय होत!

अनेकदा आपण खात असलेल्या पदार्थांवर किंवा हॉटेलमध्ये ठेवलेल्या पदार्थांवर माश्या बसलेल्या बघतो. कचऱ्याच्या ढिगावरही अनेक त्या दिसतात. माश्यांमुळे आरोग्य कसं बिघडतं हे सगळ्यांनाच माहीत असेल. पण एखाद्या पदार्थांवर बसल्यावर काय नेमकं होतं? हे अनेकांनी पाहिलेलं नसतं.

एका व्यक्तीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात दाखवण्यात आलंय की, माशी जेव्हा पदार्थावर बसते तेव्हा काय होतं. हा व्हिडीओ जॅक डी. फिल्म्सने शेअर केला आहे. व्हिडिओत लिहिलं आहे की, माश्या अन्नाला मनुष्यांसारखं चावत नाही, तर त्यावर एक विशेष लाळ सोडतात.

यात पुढे सांगण्यात आलं की, या लाळेमध्ये डायजेस्टिव एंझाइम असतात, जे तुमच्या अन्नाला एका तरल पदार्थात बदलतात. मग माश्या हा पदार्थ एखाद्या स्मूदीसारखं पिऊ लागतात. यासाठी त्या सोंडेचा वापर करतात. हा व्हिडीओ पाहून अनेक यूजर हैराण झाले आहेत.

व्हिडीओवर अनेकांनी कमेंटही केल्या. एकाने लिहिलं की, 'अरे देवा...हे मी काय पाहिलं'. दुसऱ्याने लिहिलं की, 'सगळ्यांनी लक्षात ठेवा माश्या दिवसभर कचऱ्यावर बसलेल्या असतात. आणि ते त्या तुमच्या खाण्यावर टाकतात. त्यांच्या पायांची घाणही अन्नाला लागते. त्यामुळे ती काहीच खात नाही ज्यावर माश्या बसलेल्या असतात. 

एक तिसरा यूजर म्हणाला की, 'मी या गोष्टीने हैराण आहे की, लोकांना माहीतच नाही माशी कशी जेवण करते'. बऱ्याच लोकांनी अशाच अवाक् होत कमेंट्स केल्या आहेत. डॉ. कॅमरून वेब यांनी सिडनी यूनिवर्सिटीसाठी एक लेख लिहून हे स्पष्ट केलं आहे की, माश्या ठीक अशाच जेवण करतात. 
 

Web Title: What happens when fly lands on food reveals video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.