Video: मेट्रोत चाललंय तरी काय? आता युवकाने चक्क ट्रेनमध्येच सुरू केली अंघोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 06:20 PM2023-04-09T18:20:58+5:302023-04-09T18:27:24+5:30

न्यूयॉर्क सिटीमधील मेट्रो ट्रेनच्या डब्ब्यातच हा माणूस अंगातील कपडे काढून अंघोळ करताना दिसून येतो.

What if it's going in the metro? Now the young man started bathing in the metro, video viral on social media | Video: मेट्रोत चाललंय तरी काय? आता युवकाने चक्क ट्रेनमध्येच सुरू केली अंघोळ

Video: मेट्रोत चाललंय तरी काय? आता युवकाने चक्क ट्रेनमध्येच सुरू केली अंघोळ

googlenewsNext

कुणाला कधी कुठं हुक्की येईल आणि कोण कुठं काय करेल, याचा नेम नसतो. कधी कधी सार्वजनिक ठिकाणीही लोकं चित्र-विचित्र गोष्टी करतात, आपल्या खासगी किंवा व्यक्तीगत गोष्टींनाही सार्वजनिक ठिकाणी करताना जराही लाजत नाहीत. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, चक्क मेट्रो ट्रेनमध्ये एक चांगले कपडे परिधान केलेली व्यक्ती सुटकेस उघडून तिथेच अंघोळ करायला सुरुवात करते. अमेरिकेच्या न्यूयॉर्क सिटीमधील हा व्हिडिओ आहे. 

न्यूयॉर्क सिटीमधील मेट्रो ट्रेनच्या डब्ब्यातच हा माणूस अंगातील कपडे काढून अंघोळ करताना दिसून येतो. विशेष म्हणजे तो अंगाला साबणही लावत असल्याचे दिसून येते. अंगावर ड्रममधून पाणी ओतून पुन्हा टॉवेलने अंग पुसत आहे. या प्रवासी व्यक्तीशेजारी बसलेल्या प्रवाशांनाही हा आश्चर्याचा धक्काच होता. त्यामुळेच, तेथील महिला प्रवासी जागेवरुन उठून दुसरीकडे धाव घेत असल्याचेही व्हिडिओत दिसून येते. हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून आत्तापर्यंत १४ लाखांहून अधिक लोकांनी एका अकाऊंटवरुन पाहिल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीतील मेट्रोतून प्रवास करणाऱ्या एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ही मुलगा फॅशन डिझायनर होती. पण, अतिशय तोडक्या कपड्यात ती मेट्रोमधून वावरत होती. त्यामुळेच, तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर, आता हा न्यूयॉर्क सिटीतील हा बाबाचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Web Title: What if it's going in the metro? Now the young man started bathing in the metro, video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.