Bangkok शहराचं पूर्ण नाव माहीत आहे? Guinness book मध्ये मिळालं आहे स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 02:02 PM2024-02-23T14:02:27+5:302024-02-23T14:03:21+5:30

Viral Video : बॅंकॉकचं पूर्ण नाव इतकं लांब आहे की, हे जगातील एखाद्या शहराचं सगळ्यात लांब नाव असेल.

What is Bangkok city full name? you will shocked when see this video | Bangkok शहराचं पूर्ण नाव माहीत आहे? Guinness book मध्ये मिळालं आहे स्थान

Bangkok शहराचं पूर्ण नाव माहीत आहे? Guinness book मध्ये मिळालं आहे स्थान

Viral Video : पर्यटनाच्या दृष्टीने थायलॅंडची राजधानी बॅंकॉक नेहमीच पर्यटकांची पहिली पसंत मानलं जातं. इथे फिरण्यासाठी जगभरातून दरवर्षी लाखो लोक येतात. हे शहर आपल्या पार्ट्यांसाठी, नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभरात फेमस आहे. पण फार कमी लोकांना बॅंकॉकचं खरं नाव माहीत असेल. बॅंकॉकचं पूर्ण नाव इतकं लांब आहे की, हे जगातील एखाद्या शहराचं सगळ्यात लांब नाव असेल. असा दावा केला जातो. अशात नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओची चर्चा सुरू आहे. या शहराचं नाव एखाद्या कवितेसारखं आहे.

बॅंकॉचं खरं आणि पूर्ण नाव पुढील प्रमाणे आहे, "Krung Thep Mahanakhon Amon Rattanakosin Mahinthara Ayuthaya Mahadilok Phop Noppharat Ratchathani Burirom Udomratchaniwet Mahasathan Amon Piman Awatan Sathit Sakkathattiya Witsanukam Prasit" . याचा अर्थ असा आहे की, 'देवदुतांचं शहर, अमर लोकांचं महान शहर, नऊ रत्नांचं शानदार शहर, राजाची गादी, शाही महालांचं शहर, देवतांच्या अवताराचं घर, इंद्राच्या आदेशाने बनवण्यात आलेलं शहर'.

पण जास्तीत जास्त लोक याला शॉर्टमध्ये "क्रुंग थेप महा नखोन" असं म्हणतात. पण या शहराच्या नावात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक टूर गाइड पर्यटकांना शहराचं पूर्ण नाव सांगत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर बरेच लोक हैराण झाले कारण त्यांनाही हे माहीत नव्हतं. 
 

Web Title: What is Bangkok city full name? you will shocked when see this video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.