चॅलेंज! या रहस्यमय फोटोत सर्वातआधी तुम्हाला काय दिसतं? खरा चेहरा शोधणं आहे अवघड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 05:04 PM2022-04-01T17:04:45+5:302022-04-01T17:11:35+5:30
Optical Illusion Viral Photo: एक ऑप्टिकल इल्यूजन असलेला फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा फोटो पाहून लोक अवाक् झाले आहेत. विचारात पडले आहेत की, नेमकं यात आहे काय?
Optical Illusion Viral Photo: सोशल मीडियावर नेहमीच असे फोटो व्हायरल होत असतात जे बघितल्यावर भ्रम निर्माण होतो. म्हणजे जे समोर असतं ते दिसत नाही. या फोटोंमध्ये बऱ्याच गोष्टी असल्याने या फोटोंवर लोकांच्या नजरा टिकून राहतात. असाच एक ऑप्टिकल इल्यूजन असलेला फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा फोटो पाहून लोक अवाक् झाले आहेत. विचारात पडले आहेत की, नेमकं यात आहे काय?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोत दोन पेटिंग आहेत. ज्या ऑक्टेवियो ओकाम्पो (Octavio Ocampo) ने बनवल्या आहेत. या पेंटिंगचं शीर्षक 'फॉरएवर ऑलवेज' (Forever Always) आहे.
काही लोक एका वयोवृद्ध कपलला एकमेकांच्या समोरासमोर बघत आहेत. एक अशीही व्याख्या आहे की, पेंटिंगमध्ये एक तरूण एका महिलेच्या बाजूला बसून एक वाद्य वाजवताना दिसत आहे. पुरूषाने मेक्सिकन टोपी घातलेली आहे आणि गिटार वाजवत आहे. तर महिला त्याच्याजवळ बसली आहे.
त्यासोबत असंही सांगितलं जात आहे की, जे लोक सर्वातआधी वयोवृद्ध व्यक्तीला बघतात त्यांनी जीवन पूर्णपणे जगलं आहे आणि आपल्या शांततेचा आनंद घेत आहेत. तेच ज्या लोकांना तरूण जोडपं दिसतं ते आपल्या युवावस्थेच्या दरम्यान असतात आणि भविष्याचा सामना करण्यासाठी तयार आहेत.