एका लग्नाची भलतीच गोष्ट! लग्नसमारंभात पाहुण्यांनीच घासली भांडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 12:06 PM2021-07-05T12:06:52+5:302021-07-05T12:08:20+5:30
लग्नसमारंभातून आल्यावर आपण अनेक चर्चा एकतो की जेवण छानं होतं. नवरानवरीचा ड्रेस छान होता. पण एका लग्नाची भलतीच गोष्ट ऐकायला मिळतेय. एका लग्नसमारंभात चक्क जोडप्यानेच पाहुण्यांना लग्नातली भांडी घासायला लावली. बसला ना धक्का? मग पुढे वाचा...

रेडिट या सोशल मिडिया साईटवर एका युजरने पोस्ट केलं आहे की इग्लंडमधल्या एका लग्नात नवरा नवरीच्या इशाऱ्यावर पाहुण्यांनाच भांडी घासावी लागली. त्या युजरने सांगितले की, जेव्हा आम्ही लग्नात गेलो तेव्हा नवरा नवरीने सुंदर ड्रेस परिधान केला होता. जेवणही सुंदर होतं. पण कमी होतं. आम्ही जेवण जेवलो आणि त्यानंतर आम्हाला किचनमध्ये नेण्यात आलं. आम्हाला वाटलं कि आमच्यासाठी काही सरप्राईज आहे. पण घडलं भलतच. आम्हाला भांडी घासण्यास सांगण्यात आले. आम्हाला ते बघुन धक्काच बसला.
दरम्यान हे सर्व खर्च वाचवण्यासाठी करण्यात आल्याचे आम्हाला कळले. नवरा नवरीच्या ड्रेसवर इतका खर्च करण्यात आला होता की त्यांच्याकडे बघुन असं वाटणारही नाही की लग्नातील पाहुणे मंडळींना भांडी घासायला लावले जात आहे. दरम्यान त्यांच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या. समजा तुम्ही अशा कोणत्या समारंभात गेलात आणि तुमच्यावर असा प्रसंग आला तर तुम्ही काय कराल? असेही प्रश्न विचारण्यात आले.