फोटोत दिसत असलेलं सुकलेलं पान पान नाहीये, सत्य बघाल तर बसेल धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 12:15 PM2022-09-08T12:15:45+5:302022-09-08T12:16:49+5:30
Viral Video : लक्ष देऊन पाहिलं तर या पानाचं सत्य काही वेगळंच आहे. व्हिडीओच्या सुरूवातीला बघाल तर हे केवळ एक वाळलेलं पान दिसेल, पण सत्य काही वेगळंच आहे.
Social Media Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच एकापेक्षा एक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा हे व्हिडीओ पाहिल्यावर आपल्याला खूप आनंद मिळतो तर कधी कधी आपण कन्फ्यूज होत असतो. सोशल मीडियावर एक असाच फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक वाळलेलं पान दिसत आहे. पण लक्ष देऊन पाहिलं तर या पानाचं सत्य काही वेगळंच आहे. व्हिडीओच्या सुरूवातीला बघाल तर हे केवळ एक वाळलेलं पान दिसेल, पण सत्य काही वेगळंच आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे एक सुकलेलं पान एका जागी पडलेलं आहे. पहिल्यांदा ते लक्षात येत नाही. पण तेव्हाच एक व्यक्ती या पानाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतं तेव्हा समजतं की, हे सुकलेलं पान नाही तर एक फुलपाखरू आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून लोक कन्फ्यूज झाले आहेत.
Kallima inachus, the orange oakleaf, is a butterfly found in Tropical Asia. With wings closed, it closely resembles a dry leaf with dark veins and is a spectacular and commonly cited example of camouflage https://t.co/Gni6zCMGpn [source of the gif: https://t.co/RSSUeIGwJx] pic.twitter.com/fiooNzm2hZ
— Massimo (@Rainmaker1973) August 21, 2022
व्हायरल झालेला हा व्हिडीओ Rainmaker1973 नावाच्या ट्विटर यूजरने शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत तब्बल 35 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर हजारो लोकांनी कमेंट्सही केल्या आहेत. सोशल मीडियावर नेहमीच अशाप्रकारचे आश्चर्यकारक किंवा ऑप्टिकल इल्यूजन असलेले व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण हा व्हिडीओ जरा वेगळा आणि सर्वांना चकित करणारा आहे.