मुलीने व्हॉट्स अॅप फॅमिली ग्रुपवर मेसेज पाठवला, घरचे मेसेज वाचून झाले थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 02:43 PM2022-12-16T14:43:23+5:302022-12-16T14:55:17+5:30
शिक्षणासाठी, नोकरीसाठी अनेकांना स्वत:चे शहर, घर सोडून बाहेर रहावे लागते. अनेकजण वसतिगृहात राहतात. यावेळी सर्वांनाच घरच्या जेवनाची आठवण येते.
शिक्षणासाठी, नोकरीसाठी अनेकांना स्वत:चे शहर, घर सोडून बाहेर रहावे लागते. अनेकजण वसतिगृहात राहतात. यावेळी सर्वांनाच घरच्या जेवनाची आठवण येते. घरच्या जेवनाची चव आपल्याला बाहेरच्या जेवनात येत नाही. वसतिगृहातील जेवणाचा कंटाळा आल्याने अनेकजण बाहेरचे खाणे पसंत करतात. जेव्हा एखादा विद्यार्थी त्यांच्या घरी जातात तेव्हा त्यांना चांगले पदार्थ खायला आवडतात. आपण घरी आल्यानंतर वसतिगृहातील मित्रांसाठीही आपण घरचे पदार्थ घेऊन जातो.
Daughter is coming home on 16th evening after 5 months. Hostel (and hers is a vaishnav one) really makes kids bhukkad-Bhikhari!
— Shwetank (@shwetankbhushan) December 11, 2022
🤦🏽♂️🤦🏽♂️ pic.twitter.com/JOVRCYWX0Y
सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे, हे पाहिल्यानंतर तुम्हालाही तुमचे हॉस्टेलचे दिवस आठवतील. एक मुलगी जेव्हा तिच्या घरी जाणार होती, तेव्हा तिने तिच्या फॅमिली ग्रुपवर असा मेसेज केला, जो पाहून पालकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. खरं तर, मुलगी अनेक दिवसांनी घरी परतत होती आणि तिने तिच्या आवडीच्या पदार्थांची यादी आधीच बनवली होती. व्हॉट्सअॅप फॅमिली ग्रुपवरील चॅट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चॅटचा स्क्रीनशॉट पाहून नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
समुद्रात पोहताना कधी शार्क जवळ आला त्यांना कळलंच नाही, आणि मग...पाहा व्हायरल व्हिडिओ
घरी परतणाऱ्या एका मुलीने वसतिगृहातून घरी आल्यावर मेनूमध्ये तिला आवडलेल्या गोष्टींची यादी पाठवली. स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही पाहू शकता की तिने त्यांच्या पालकांना तिने सांगितलेल्या गोष्टींची यादी तयार करण्यास सांगितली. या यादीमध्ये - फिश टिक्का, कबाब, बिर्याणी आणि अगदी न्यूटेला चीजकेक यांचा समावेश आहे. 'मुलगी 16 तारखेच्या संध्याकाळी 5 महिन्यांनंतर घरी येत आहे, असं वडिलांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.