VIDEO : हरणाच्या पाडसाकडे जात होती मगर, आईने जे केलं ते पाहून पाणावले लोकांचे डोळे.....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 09:23 AM2021-02-08T09:23:55+5:302021-02-08T09:33:31+5:30

जर आपल्या लेकराचा जीव धोक्यात असेल तर आई आपल्या जीवाची पर्वा न करता त्याचा जीव वाचवते. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यात हरणाचं पाडस जंगलात नदी पार करत असतं.

When crocodile attack on deer mother made sacrifice her own life video goes viral | VIDEO : हरणाच्या पाडसाकडे जात होती मगर, आईने जे केलं ते पाहून पाणावले लोकांचे डोळे.....

VIDEO : हरणाच्या पाडसाकडे जात होती मगर, आईने जे केलं ते पाहून पाणावले लोकांचे डोळे.....

Next

आई देवाचं रूप असते. याची अनेक उदाहरणे आपल्याला वेळोवेळी बघायला मिळतात. आई आपल्या प्रत्येक लेकरावर एकसारखं प्रेम करते. आपल्या लेकरांना समजून घेते. जर आपल्या लेकराचा जीव धोक्यात असेल तर आई आपल्या जीवाची पर्वा न करता त्याचा जीव वाचवते. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यात हरणाचं पाडस जंगलात नदी पार करत असतं. अशातच त्याच्या मागे एक मगर लागते. त्यानंतर पाडसाला वाचवण्यासाठी हरीण जे करते ते पाहून डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही.

सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ते आयएफएस अधिकारी आहेत. त्यांनी याच्या कॅप्शनला लिहिले की, 'जगातील सर्व शक्ती आईच्या शक्तीसमोर कमीच आहेत. हा व्हिडीओ एका हरीणाचा आहे जी आपल्या पाडसाला वाचवण्यासाठी स्वत: मगरीची शिकार होते'. या व्हिडीओत बघितलं जाऊ शकतं की, कशाप्रकारे एक आई आपल्या बाळाला वाचवण्यासाठी स्वत: बलिदान देते. (हे पण बघा : याला म्हणतात दरारा! छोट्याश्या कुत्र्याच्या पिल्लाला घाबरून मगरीनं काढला पळ; पाहा व्हायरल VIDEO)

हा व्हिडीओ पाहून यूजर्सचं मन दुखत आहे. लोक भरभरून भावनिक कमेंट्स करत आहेत. आईच्या दैवी रूपाचं वर्णन करत आहेत. एकाने लिहिले की, मनुष्य असो वा प्राणी आई दर्जा नेहमी एकच असतो. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक भरभरून रिट्विट करत आहेत. या व्हिडीओला ५ हजारांपेक्षा लाइक्स आणि १.७ हजरांपेक्षा कमेंट मिळाल्या आहेत.
 

Web Title: When crocodile attack on deer mother made sacrifice her own life video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.