Video : एटिएममुळे तुमचं खातं होऊ शकतं रिकामं; पोलिसांनी मराठीतून दिली महत्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 13:07 IST2020-11-25T13:02:36+5:302020-11-25T13:07:36+5:30
Viral Video in Marathi : पैसे काढण्यासाठी लाखो लोकांकडून रोज एटीएमचा वापर केला जातो. अनेक ठिकाणी एटीएमचा दुरूपयोग केला जात असून या माध्यमातून लोकांच्या खात्यातील पैसे लंपास केले जात आहे.

Video : एटिएममुळे तुमचं खातं होऊ शकतं रिकामं; पोलिसांनी मराठीतून दिली महत्वाची माहिती
सध्याच्या परिस्थिती सायबर क्राईम्सच्या गुन्हात वाढ होत आहे. कोरोनाकाळात अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. तसंच सर्वसामान्यांकडे पैश्यांची चणचण भासत आहे. पण कोरोना येवो किंवा कोणतंही मोठं संकट समाजातील गुन्हेगारी काही कमी होत नाही. पैसे काढण्यासाठी लाखो लोकांकडून रोज एटीएमचा वापर केला जातो. अनेक ठिकाणी एटीएमचा दुरूपयोग केला जात असून या माध्यमातून लोकांच्या खात्यातील पैसे लंपास केले जात आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Using ATM to withdraw cash....? Watch this ..! pic.twitter.com/CzSCovT9Cj
— Dayanand Kamble (@dayakamPR) November 23, 2020
एका पोलिसाने एटीएमच्या माध्यमातून कशाप्रकारे गंडा घातला जाऊ शकतो हे सांगितले आहे. द्यानंद कांबळे यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ड्यूपलिकेट पार्ट्स लावून कशा पद्धतीने एटीएममधून पैसे बाहेर काढले जातात. इतकचं नाही तर कॅमेरा लावून तुमचा पासवर्डही चोरी केला जाऊ शकतो. रिअल हिरो! रुग्णालयाला लागली आग; अन् गर्भवती कुत्रीने जीवाशी खेळत वाचवले लोकांचे प्राण, पाहा फोटो
कार्ड आणि पासवर्डबाबतची माहिती कळू नये यासाठी काय करायला हवं. हे या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, सगळ्यात आधी कार्ड लावण्याची जागा योग्य आहे का डबल प्लास्टीक लावले आहे का? हे पाहून घ्यायला हवं. तसंच पासवर्ड टाकण्याआधी एक हात वर आडवा लावून मग पासवर्ड लावून पासवर्ड टाका. हा व्हिडीओ आतापर्यंत २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून ८ हजारांपेक्षा जास्त लोकांना या व्हिडीओला लाईक केलं आहे. जबरदस्ती केस कापताना रडकुंडीला आला चिमुरडा; अन् न्हाव्याला धमकीच दिली, पाहा व्हिडीओ