कोरोना आहे भाऊ!, PPE किट घालून 'तो' मेट्रोत बसला अन् मेजरमेंट टेपनं राखतोय सोशल डिस्टन्सिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 16:43 IST2020-09-05T16:42:57+5:302020-09-05T16:43:48+5:30
जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 68 लाख 23,084 इतकी झाली आहे.

कोरोना आहे भाऊ!, PPE किट घालून 'तो' मेट्रोत बसला अन् मेजरमेंट टेपनं राखतोय सोशल डिस्टन्सिंग
जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 68 लाख 23,084 इतकी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 89 लाख 28,494 रुग्ण बरे झाले आहेत, परंतु 8 लाख 79, 462 जणांचा जीव गेला आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात मागील 6-7महिन्यांपासून लॉकडाऊन जाहीर केला गेला आहे. पण, आता हळुहळू जगही अनलॉकच्या दिशेनं पाऊल टाकत आहे. पण, सुरक्षिततेच्या सर्व खबरदारी घेतल्या जात आहेत. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आदी सर्व नियमांचं काटेकोर पालन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कोरोना संकटात मेट्रो प्रवास करणारा युवक चक्क PPE किट घालून पोहोचला. त्यानंतर त्यान सोशल डिस्टन्सिंगसाठी जे केलं ते पाहण्यासारखंच होतं.
"काय केलतं त्या पबजीनं?... इथे परिस्थिती काय?"; वैतागलेल्या PUBG वेड्या पोराचा व्हिडीओ व्हायरल
भारतातील कोरोना आकडा
भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 40 लाख 34,339 इतकी झाली आहे. त्यापैकी 69,749 रुग्णांचा जीव गेला असून 31 लाख 12,669 रुग्ण बरे झाले आहेत. जगभरातील सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या देशांत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत सर्वाधिक 63 लाख 89,413 रुग्ण आहेत, त्यापाठोपाठ ब्राझीलमध्ये 40 लाख 91,801 रुग्ण आहेत.
पाहा व्हिडीओ...
When social distancing becomes an obsession.. @hvgoenkapic.twitter.com/AGvEaxAPDY
— Dinesh Joshi. (@dineshjoshi70) September 4, 2020