ऐकावं ते नवलच! पत्नी माहेरी गेली म्हणून संतप्त पतीने आख्ख्या घरालाच लावली आग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 12:29 PM2023-06-09T12:29:29+5:302023-06-09T12:31:07+5:30
पत्नी माहेरी गेल्याने नाराज झालेल्या पतीने धक्कादायक पाऊल उचलले आहे.
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी माहेरी गेल्याच्या संतापातून पतीने आपलं स्वत:चे आख्ख घरचं पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण घर जळून खाक झाले. आगीचे लोळ पाहून ग्रामस्थांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. वडिलांनी आरोपी मुलाविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तहरीर मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
बाथरूम १० मिनिटात स्वच्छ चकाचक करण्याच्या ६ टिप्स, दुर्गंधी होईल कमी
काजू गावात राहणारा मातादिन हा मजुरीचे काम करतो. त्यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी त्यांचा मुलगा मुकुल देव दारूच्या नशेत घरी पोहोचला आणि त्याने पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. विरोध केल्यावर त्याने तिला बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे संतापलेली महिला मुलांना घेऊन तिच्या माहेरी गेली. पत्नी माहेरी गेल्याने संतापलेल्या मुकुलने घराला आग लावली. आगीचे लोळ पाहून घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. आगीत मतादीन यांचे सुमारे एक लाख रुपये किमतीचे घर जळून खाक झाले.
आग लावण्याच्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती आजूबाजूच्या ग्रामस्थांनी चरवा पोलीस ठाण्याच्या पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मुकुल देव यांचे वडील मतदीन यांनी आपल्या मुलाविरुद्ध घराला आग लावल्याची तक्रार दिली असून कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक समर बहादूर सिंह यांनी सांगितले की, मतदीन यांनी त्यांच्या मुलाविरुद्ध तक्रार केली आहे. तपास केला जात आहे.