कोणत्या दिशेला फिरतोय घोडा? उत्तर देण्यात 99 टक्के लोक फेल; बघा- तुम्हाला जमतंय का
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 06:10 PM2022-03-23T18:10:08+5:302022-03-23T18:11:55+5:30
हे व्हायरल ऑप्टिकल इल्यूजन YouTube वर पोस्ट करण्यात आले असून, यातील घोडा कोणत्या दिशेला फिरत आहे, असा प्रश्न युजर्सना करण्यात आला आहे.
इंटरनेट अनेक मनोरंजक गोष्टींनी अथवा ऑप्टिकल इल्यूजनने (Optical Illusion) भरलेले आहे. महत्वाचे म्हणजे, यात आपल्याला खिळवून ठेवण्याची जबरदस्त क्षमता आहे. एवढेच नाही, तर प्रसिद्ध हॅरी पॉटरचे (Harry Potter) लेखक जेके राउलिंग यांनीही एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो शेअर केला होता. तो फोटो पाहून सगळेच थक्क झाले होते. आता एका घोड्याचे इल्यूजन इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पाहून सांगा, कोणत्या दिशेला फिरतोय घोडा? -
हे व्हायरल ऑप्टिकल इल्यूजन YouTube वर पोस्ट करण्यात आले असून, यातील घोडा कोणत्या दिशेला फिरत आहे, असा प्रश्न युजर्सना करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये घोडा आपली दिशा बदलताना दिसत आहे. पण, हा घोडा क्लॉकवाइज फिरतोय, की अँटी-क्लॉकवाइज? असा प्रश्न अनेक सोशल मीडिया (Social Media) युजर्सना पडला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना, 'हा घोडा कोणत्या दिशेला फिरत आहे? उजवीकडे की डावीकडे?' असे लिहिण्यात आले आहे.
व्हिडिओ पाहून युजर्सनी दिल्या अशा प्रतिक्रिया -
हा ऑप्टिकल इल्यूजन असलेला व्हिडिओ पाहून युजर्सनी आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे, 'पाय बघा, आपल्याला उत्तर मिळून जाईल की, हा घोडा कोणत्या दिशेने फिरत आहे.' आणखी एका युजरने लिहिले आहे की, 'तो घड्याळासारखा फिरत आहे. हे पाहण्यासाठी त्याला अस्पष्ट दृष्टीने पाहा. यावर असलेल्या डॉट्समुळे तो दोन्ही बाजुंनी फिरताना दिसतो.'