भारतात इथे आढळून आला पांढऱ्या रंगाचा किंग कोब्रा, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 01:41 PM2023-07-31T13:41:18+5:302023-07-31T13:43:43+5:30
White King Cobra:साप पाच फूट लांब आणि त्याला चंबा जिल्ह्याच्या झुडपांमध्ये बघण्यात आलं. याआधी गेल्यावर्षी पुणे शहरात एक अल्बिनो साप आढळून आला होता.
White King Cobra: हिमाचल प्रदेश सध्या जोरदात पाऊस सुरू आहे. सोबतच स्थिती वाईट आहे. अशात इथे एक पांढऱ्या रंगाचा दुर्मिळ साप आढळून आला. या सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आधी तर हा एक किंग कोब्रा वाटत होता पण नंतर माहीत घेतल्यावर लोकांना समजलं की, तो साप एक अल्बिनो साप आहे.
एका रिपोर्टनुसार, साप पाच फूट लांब आणि त्याला चंबा जिल्ह्याच्या झुडपांमध्ये बघण्यात आलं. याआधी गेल्यावर्षी पुणे शहरात एक अल्बिनो साप आढळून आला होता.
अल्बिनो सोप फारच कमी बघायला मिळतात आणि या सापांना एका दुर्मिळ सापांच्या प्रजातीमध्ये वर्ग करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर या सापाचा व्हिडीओ ट्विटरवर @BadkaHimachali नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.
दुर्लभ एल्बिनो सांप 🐍
— Badka Himachali (@BadkaHimachali) July 29, 2023
वीडियो हिमाचल प्रदेश के चंबा जिले का बताया जा रहा है।#Himachal#Chamba#albinosnake#RareSnakepic.twitter.com/eHT9v3tke9
अल्बिनो सापाची प्रजाती आनुवांशिक असामान्यतेमुळे तयार होते. ज्याला अल्बिनिजम असं म्हटलं जातं. त्यांना डोळ्यांनी फार जास्त क्लीअर दिसत नाही. अल्बिनिजममुळे सापांच्या डोळ्यांचा रंग जास्त लाल होतो आणि सापांच्या डोळ्यांची दृष्टी कमी होते.