'लिंबू कलरची साडी'वाल्या पोलिंग ऑफिसरचे फोटो व्हायरल; कोण आहे 'ती'?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 02:15 PM2019-05-11T14:15:47+5:302019-05-11T14:31:08+5:30

सध्या देशभरात लोकसभा निवडणूक २०१९ चं जोरदार वारं वाहत आहे. सोशल मीडियातूनही याबाबत वेगवेगळ्या गोष्टी सतत व्हायरल होत असतात.

Who is this lady polling officer in yellow Saree? Photo goes viral | 'लिंबू कलरची साडी'वाल्या पोलिंग ऑफिसरचे फोटो व्हायरल; कोण आहे 'ती'?

'लिंबू कलरची साडी'वाल्या पोलिंग ऑफिसरचे फोटो व्हायरल; कोण आहे 'ती'?

googlenewsNext

सध्या देशभरात लोकसभा निवडणूक २०१९ चं जोरदार वारं वाहत आहे. सोशल मीडियातूनही याबाबत वेगवेगळ्या गोष्टी सतत व्हायरल होत आहेत. अशातच एका पिवळ्या साडीतील महिलेचे फोटो चांगलेच व्हायरल झालेत. ही महिला रिटर्निंग ऑफिसर असून तिची चर्चा मीडिया आणि सोशल मीडिया अशी दोन्हींकडे रंगली आहे. या महिलेचं नाव नलिनी सिंह असल्याचा दावा करण्यात आला आलाय. पण तो खोटा आहे. 

मिसेस जयपूर आणि १०० टक्के मतदानाचा दावा

(Image Credit : ABP Asmita - ABP Live)

फेसबुकवर या महिलेचे फोटो शेअर करत असा दावा केला जात आहे की, या महिलेचं नाव नलिनी सिंह असून ती 'मिसेस जयपूर' राहिलेली आहे. तसेच असेही सांगण्यात आले आहे की, मतदानावेळी त्यांची ड्युटी ईएसआयजवळ कुमावत स्कूलमध्ये होती. इतकंच नाही तर असंही सांगितलं जात आहे की, यांच्या पोलिंग बूथवर १०० टक्के मतदान झालं. 

खरं नाव वेगळंच

या महिला अधिकाऱ्याच्या फोटोंना हजारो लाइक्स आणि शेअर मिळाले आहेत. फेसबुकचं नाही तर हे फोटो हॉट्सअ‍ॅपवरही व्हायरल झाले आहेत. पण जेव्हा या फोटोंची आणि व्यक्तीची चौकशी केली गेली तेव्हा समोर आलं की, या महिलेचं खरं नाव नलिनी सिंह नाही. 

जयपूर नाही लखनौचे आहेत फोटो

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हे फोटो जयपूरचे नाही तर लखनौचे आहेत. हे फोटो पत्रकार तुषार रॉय यांनी काढलेले आहेत. ईव्हीएम मशीन घेऊन जाणारी ही महिला अधिकारी लखनौच्या पीडब्ल्यूडी विभागात कनिष्ठ सहायक पदावर कार्यरत आहे आणि त्यांचं खरं नाव रीना द्विवेदी आहे. 

निवडणुकीच्या एक दिवसाआधीचे फोटो

व्हायरल झालेले फोटो ५ मे २०१९ म्हणजे निवडणुकीच्या एक दिवसाआधीचे आहेत. त्या दिवशी रीना द्विवेदी लखनौच्या नगराममध्ये बूथ नंबर १७३ वर होत्या. यावर रीना यांनी सांगितले की, 'मी तर माझी ड्युटी करत होते. मी जेव्हा माझ्या टीमसोबत ईव्हीएम मशीन घेऊन जात होते, तेव्हा एका पत्रकाराने माझे फोटो काढले. हे फोटो व्हायरल झाले आहेत. आता तर लोक रस्त्याने जातानाही माझ्यासोबत सेल्फी घेत आहेत'.

रीना यांनी सांगितलं की, त्यांच्या फोटोंवर काही सकारात्मक तर काही नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. तसेच रीनाने सांगितले की, त्यांच्या बूथवर ७० टक्के मतदान झालं. म्हणजे फोटोसोबत १०० टक्के मतदान झाल्याचं बोललं जातंय ते चुकीचं आहे. 

 

Web Title: Who is this lady polling officer in yellow Saree? Photo goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.