PPE किट घालून भन्नाट डान्स करणारी 'ही' तरूण डॉक्टर कोण आहे माहित्येय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 10:54 AM2020-07-08T10:54:37+5:302020-07-08T10:55:23+5:30
ही डॉक्टर चक्क PPE किट घालून डान्स करत असल्यानं सोशल मीडियावर त्याचीच चर्चा होती.
काही दिवसांपूर्वी पीपीई किट घालून हाय हरमी या गाण्यावर नाचत असेलल्या एका डॉक्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. हा डान्स आतापर्यंत जवळपास 5 लाखांपेक्षा जास्तवेळा पाहिला गेला आहे. डॉक्टर रिचा नेगी यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यावर त्यांनी वरुण धवन व नोरा फतेही यांच्या गर्मी या गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळाला. ही डॉक्टर चक्क PPE किट घालून डान्स करत असल्यानं सोशल मीडियावर त्याचीच चर्चा होती. १ जुलैला पोस्ट केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत ४ लाख ९१,९१७ वेळा पाहिला गेला आहे.
आता ही डॉक्टर नक्की आहे तरी कोण असा प्रश्न तुम्हाला सगळ्यांनाच पडला असेल.तर आम्ही तुम्हाला या डॉक्टर तरूणीबाबत माहिती देणार आहोत. ही डॉक्टर मुंबईची आहे. इंस्टाग्रामवर ही तरूण डॉक्टर चांगलीच एटिव्ह असते. इंस्टाग्रामच्या माध्यामातून अनेक फोटो आणि व्हिडीओ रिचा गेनी यांनी शेअर केले आहेत. डॉक्टरर्स डे च्या दिवशी सोशल मीडियावर टाकलेला हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.
सध्याच्या माहामारीत कोरोना योद्ध्यांचे कर्तव्य पार पाडत असताना अनेकदा नैराश्याचा सामना करावा लागतो. संकटांचा सामना करत लढताना नैराश्य येते असं रिचाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. कामामुळे आलेला ताण घालवण्याासाठी पीपीई किट घालून डान्स केल्याचे डॉक्टर रिचा म्हणाली. याशिवाय रिचाने वैद्यकिय क्षेत्रात करिअर निवडले असून ती उत्तम बॉक्सरही आहे. रिचाने तिचं शिक्षण ठाकूर कॉलेज मुंबई आणि डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज, नाशिक इथे पूर्ण केलं. रिचाला डान्स करायची खूप आवड आहे असं तिच्या अनेक इंन्स्टाग्राम पोस्टमधून दिसून येतं.
Shocking! बघा वर्क फ्रॉम होम असंच सुरू राहिलं तर माणूस 25 वर्षांनी कसा दिसेल?
केवळ सनी लिओनीच नाही तर 'या' 10 पॉर्न स्टार्सही आहेत विवाहित, कशी आहे त्यांची फॅमिली?