हिरव्या मेहंदीचा रंग हातांवर लाल कसा होतो? तुम्हालाही माहीत नसेल कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 12:26 PM2024-09-05T12:26:19+5:302024-09-05T12:32:24+5:30
Interesting Fact : भरपूर लोक हातांवर मेहंदी लावतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, मेहंदीचा रंग हातांवर लालच का येतो? हा रंग निळा, पिवळा किंवा वेगळा का नसतो?
Why Green Henna Turn Red: मेहंदीला सुंदरतेचं प्रतीक मानलं जातं. भारतीय लग्नांची मेहंदीशिवाय कल्पनाही करता येत नाही. लग्नांमध्ये नवरी आणि नवरदेवांच्या हातावर मेहंदी नसेल तर लग्न असल्यासारखं वाटत नाही. लग्नात किंवा सणावारांना हातांवर मेहंदी लावणं ही फार जुनी परंपरा आहे. भरपूर लोक हातांवर मेहंदी लावतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, मेहंदीचा रंग हातांवर लालच का येतो? हा रंग निळा, पिवळा किंवा वेगळा का नसतो?
कसा तयार होतो मेहंदीचा रंग?
तर मेहंदीच्या पानांमध्ये एक खास प्रकारचं केमिकल असतं ज्याला लॉसोन म्हणतात. जेव्हा मेहंदीच्या पानांचं पावडर तयार केलं जातं आणि ते हातांवर लावलं जातं तेव्हा लॉसोन हातावर असलेलं प्रोटीन कॅराटिनसोबत मिळून केमिकल रिअॅक्शन करतं. या रिअॅक्शनमुळेच हातांवर लाल किंवा गर्द भुरका रंग येतो.
लालच रंग का?
लॉसोनचा नॅचरल रंग केशरी किंवा गर्द भुरका असतो. हे जेव्हा त्वचेसोबत मिळून रिअॅक्शन करतं तेव्हा याचा रंग लाल किंवा गर्द भुरका होतो. लॉसोनची रासायनिक संरचना याशिवाय वेगळा रंग निर्माण करू शकत नाही.
कोणत्या फॅमिलीतील झाड?
मेहंदीचं झाड हे लिथ्रेसी फॅमिलीतील आहे. या झाडाची फुलं फार सुंदर आणि सुगंधी असतात. मेहंदीची पाने हिरवी असतात आणि याच पानांचा वापर केला जातो. मेहंदीच्या पानांचं पावडर तयार केल्यावर पानांमधून नॅचरल डाय लॉसोन निघतं. जेव्हा हे लॉसोन कॅरोटिनच्या संपर्कात येतं तेव्हा लाल रंग तयार होतो.
तापमानाचाही पडतो रंगावर प्रभाव
तापमानही मेहंदीच्या रंगावर प्रभाव टाकत असतं. जर तुमच्या शरीराचं तापमान थोडं जास्त असेल तर मेहंदीचा रंग आणखी गर्द होतो. थंडीच्या दिवसात मेहंदीचा रंग थोडा हलका येऊ शकतो. मेहंदीचा रंग डार्क करण्यासाठी त्यावर लिंबाचा रस किंवा साखरेचं पाणी लावू शकता. याने त्वचेला ओलावा मिळतो आआणि मेहंदीचा रंग डार्क करण्यास मदत मिळते.