बाईकच्या हॅंडलच्या कोपऱ्यावर का असतो 'हा' लोखंडी भाग? तुम्हालाही माहीत नसेल कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 03:07 PM2024-11-16T15:07:23+5:302024-11-16T15:20:54+5:30
एका व्यक्तीने व्हिडीओद्वारे याबाबत सांगितलं आहे. मोहम्मद दानिश नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
सोशल मीडियावर बरेच लोक वेगवेगळी माहिती देणारे व्हिडीओ शेअर करत असतात. ज्यात रोजच्या जीवनातील गोष्टींची माहिती दिली जाते. अनेक आपण रोज वापरत असलेल्या गोष्टींबाबतच आपल्याला माहीत नसतं. बाईकचा वापर रोज लोक करतात. बाईकच्या हॅंडलच्या कोपऱ्यावर एक लोखंडी भाग असतो. तुम्हीही बाईक चालवताना हा लोखंडी भाग अनेकदा पाहिला असेल. पण तो तिथे का असतो हे तुम्हाला माहीत नसेल.
एका व्यक्तीने व्हिडीओद्वारे याबाबत सांगितलं आहे. मोहम्मद दानिश नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. @mechanicaltechhindi नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्याने बाईकच्या हॅंडलच्या कोपऱ्यावर लोखंडी भाग असण्याची कारणं सांगितली आहे.
दानिशने सांगितलं की, बाईकच्या या लोखंडी भागाला बाईक बार एन्ड वेट्स असं म्हणतात. सामान्यपणे हा भाग लोखंडाचा असतो. याचे वेगवेगळे उद्देश आहे. पहिला म्हणजे बाईक चालत असताना जे व्हायब्रेशन होतं, ते या भागामुळे कमी होतं आणि नियंत्रण कायम राहतं. दुसरं कारण म्हणजे जेव्हा बाईक वेगाने धावत असते तेव्हा हॅंडल वेगामुळे हलत असतं. अशात हॅंडलचा कोपरा जड असल्याने हॅंडल कमी हलतं. आणखी एक मोठं कारण म्हणजे जेव्हा बाईक खाली पडते तेव्हा जमिनीसोबत सगळ्यात आधी हॅंडलचा संबंध येतो. या लोखंडी भागामुळे बाईकचं नुकसानही कमी होतं.
या व्हिडिओला आतापर्यंत ५७ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काही लोक म्हणाले की, हा भाग काही बाईकमध्ये प्लास्टिकचा असतो. तर काही म्हणाले की, याने काहीच फरक पडत नाही.