मैत्रिणीच्या प्रेमात पडली पत्नी, पतीने दिली संमती, तिघेही राहतात एकत्र, वाचा नेमकं प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 03:04 PM2022-11-07T15:04:44+5:302022-11-07T15:05:10+5:30

सध्या एका रिलेशनशीपचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. पती-पत्नी आणि एक महिला डेंटिस्ट असं हे रिलेशनशीप आहे. या महिला डेंटिस्टने या रिलेशनशीपवर धक्कादायक खुलासा केला आहे.

Wife fell in love with friend, husband gave consent, all three live together, read the actual case | मैत्रिणीच्या प्रेमात पडली पत्नी, पतीने दिली संमती, तिघेही राहतात एकत्र, वाचा नेमकं प्रकरण

मैत्रिणीच्या प्रेमात पडली पत्नी, पतीने दिली संमती, तिघेही राहतात एकत्र, वाचा नेमकं प्रकरण

Next

सध्या एका रिलेशनशीपचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. पती-पत्नी आणि एक महिला डेंटिस्ट असं हे रिलेशनशीप आहे. या महिला डेंटिस्टने या रिलेशनशीपवर धक्कादायक खुलासा केला आहे. पतीपासून वेगळे राहिल्यानंतर ती या रिलेशनशीपमध्ये आली आहे. या डेंटीस्टची तीन मुल आणि दाम्पत्याची २ मुल हे सर्व एकत्रच राहतात. 

३९ वर्षाच्या या डेंटिस्टचे नाव डॉ मिशेल मार्टिनेज सरसोला आहे. ती मूळची अमेरिकेची आहे. जेव्हा ती कोडी आणि बेकी वॅटकिन्सला भेटली तेव्हा ती स्वतः मिशेल टियांचीच्या क्रॉसफिट जिममध्ये एका विवाहित जोडप्याला भेटली. 

बाबांचं ६० वर्ष जुनं पासबूक सापडलं अन् लेक करोडपती झाला; रातोरात नशीब पालटलं

२०२० मध्ये मिशेलचे लग्न मोडले. मग तिच्या ३३ वर्षीय मैत्रिण बेकीने तिला वाईट काळात मदत केली. पण त्यांचे नाते मैत्रीच्या पलीकडे गेले. ते रिलेशनशिपमध्ये आले. त्यानंतर बेकीच्या पतीनेही या नात्याला होकार दिला.

मिशेल, बेकी आणि बेकीचा ४० वर्षांचा पती, कोडी, यांचे आता प्रेमसंबंध आहेत. फ्लोरिडामध्ये राहणारे बेकी आणि कोडी २००७ पासून रिलेशनशिपमध्ये होते.बेकी ही एकमेव महिला आहे तिला मी डेट केले आहे आणि जिच्याबद्दल माझ्या भावना आहेत, असं  मिशेल म्हणाली. 

"यापूर्वी मी एका पुरुषासोबत काही वर्षे वैवाहिक जीवन जगलो होतो. आम्हाला तीन मुलंही आहेत. बेकीने आणि कोडीला दोन मुलेही आहेत. पाचही मुले एकमेकांसोबत खूप चांगले राहतात. 

Web Title: Wife fell in love with friend, husband gave consent, all three live together, read the actual case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.