बाबो! एका फोटोमुळं पत्नीनं पतीवर घेतला संशय; हनीमूनवरुन परतताना जोरदार भांडण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 12:47 PM2021-09-30T12:47:48+5:302021-09-30T12:49:37+5:30

हनीमूनहून परतणाऱ्या एका कपल्सचं अचानक भांडण सुरु झालं. पतीने बीचवर काढलेल्या एका फोटोवरुन पती-पत्नीत वाद झाला

Wife re-watches holiday video to find husband 'filming bikini-clad woman behind her' | बाबो! एका फोटोमुळं पत्नीनं पतीवर घेतला संशय; हनीमूनवरुन परतताना जोरदार भांडण

बाबो! एका फोटोमुळं पत्नीनं पतीवर घेतला संशय; हनीमूनवरुन परतताना जोरदार भांडण

googlenewsNext
ठळक मुद्देअमेरिकेतील फ्लोरिडात एक महिला तिच्या पतीसोबत समुद्रकिनारी फिरायला गेली होती.जेव्हा मी बीचवर फिरत होती तेव्हा पतीने तिचा फोटो काढला.टिकटॉकवर या महिलेने पतीनं विश्वासघात केल्याचा पुरावा म्हणून हा फोटो दाखवला.

नवी दिल्ली – सध्याच्या युगात मोबाईल अथवा कॅमेरा आल्याने अनेक आठवणी फोटोत कैद करणं सोप्प झालं आहे. फोटोमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. फोटोमुळे अनेक क्षण कॅमेऱ्यात कैद करून आपल्याला हवं तेव्हा ते पुन्हा पाहता येतात. परंतु याच फोटोमुळं कुणाच्या आयुष्यात काय घडेल हे सांगता येणं कठीण आहे. अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टीतून याची प्रचिती नक्कीच येते.

हनीमूनहून परतणाऱ्या एका कपल्सचं अचानक भांडण सुरु झालं. पतीने बीचवर काढलेल्या एका फोटोवरुन पती-पत्नीत वाद झाला. या फोटोत पत्नीसोबत आणखी एकजण कैद झालं ज्यावरून पती-पत्नीत वादविवाद झाला. एका फोटोवरुन पतीची पोलखोल झाली आणि तिने सोशल मीडियावर हे फोटो शेअर केलेत. काय आहे हे प्रकरण? जाणून घेऊया

अमेरिकेतील फ्लोरिडात एक महिला तिच्या पतीसोबत समुद्रकिनारी फिरायला गेली होती. परंतु जेव्हा ते घरी परतत होते. तेव्हा बीचवर काढलेले फोटो पाहून महिला हैराण झाली. या फोटो मागची संपूर्ण कहानी तिने तिच्या टिकटॉकवर शेअर केली. मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, टिकटॉकवर महिलेने याबाबत सांगितले की, जेव्हा मी बीचवर फिरत होती तेव्हा पतीने तिचा फोटो काढला. परंतु घरी परतताना मी हा फोटो पाहिला तेव्हा समजलं की पती माझा नव्हे तर दुसऱ्या कुणाचा तरी फोटो घेत होता.

महिलेनं दावा केला की, जेव्हा तिने फोटो झूम करून पाहिला तेव्हा पतीने तिच्यामागे बिकनीत उभ्या असणाऱ्या दुसऱ्या महिलेचा फोटो कैद केला होता. टिकटॉकवर या महिलेने पतीनं विश्वासघात केल्याचा पुरावा म्हणून हा फोटो दाखवला. पतीचा कॅमेऱ्यावर फोकस नव्हता तर पती माझ्या पाठीमागे आंघोळ करणाऱ्या दुसऱ्या महिलेचा फोटो घेत होता. परंतु पतीने पत्नीच्या आरोपाचं खंडन केले. मी फक्त माझ्या बायकोचे फोटो क्लिक करत होतो असं पतीने सांगितले आहे. मात्र पतीच्या बोलण्यावर पत्नीला विश्वास नाही त्यामुळे दोघा नवरा-बायकोमध्ये भांडण सुरु झालं. टिकटॉकवर ही गोष्ट शेअर केल्यानंतर महिलेला अनेक जणांनी कमेंट्स केल्या आहेत.   

Web Title: Wife re-watches holiday video to find husband 'filming bikini-clad woman behind her'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.