पत्नीने स्टेजवरच गाण्यावर धरला ठेका! पती झाला आवाक, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 15:03 IST2022-10-23T15:01:47+5:302022-10-23T15:03:12+5:30
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. लग्नातील पती पत्तीच्या डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.आपल्याकडे डान्सविना लग्न हे अपूर्णच वाटतं.

पत्नीने स्टेजवरच गाण्यावर धरला ठेका! पती झाला आवाक, व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. लग्नातील पती पत्तीच्या डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.आपल्याकडे डान्सविना लग्न हे अपूर्णच वाटते. सध्या स्वत:च्या लग्नात डान्स करण्याचा ट्रेंड आला आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पत्नीने स्टेजवरच जोरदार ठेका धरल्याचे दिसत आहे.
व्हिडिओमध्ये पत्नी स्टेजवर डान्स करताना दिसत आहे.तर दुसरीकडे पती शांतपणे उभा असल्याचे दिसत आहे.यावेळी पतीची अवस्था पाहण्यासारखी आहे.अनेकांनी सोशल मीडियावर पती विषयी काळजी व्यक्त केली.
Video - माकडाशी पंगा घेणं पडलं चांगलंच महागात; WWE स्टाईलमध्ये तरुणाला पाडलं खाली अन्...
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पती स्टेजवर बसलेला दिसत आहेत. गाणे सुरू झाल्यानंतर पत्नी स्टेजवर नाचताना दिसत आहे. तिच्यासोबत पती थोडा वेळ डान्स करतो. पण पत्नी काही थांबण्याचे नाव घेत नाही. ती स्टेजवर वेगवेगळ्या स्टेप्स करत असल्याचे दिसत आहे.
दूल्हा बेचारा फंस गया 👇😂 pic.twitter.com/0WwCJB6jXL
— Anamika Thakur (@anamika943) October 19, 2022
@anamika943 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यत दोन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून, पाच हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.