हनीमूनहून परत येताच महिलेने केला घटस्फोट घेण्याचा विचार, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 04:34 PM2024-08-14T16:34:57+5:302024-08-14T16:49:55+5:30
महिलेने सांगितलं की, त्यांच्यात एक असा वाद झाला ज्यामुळे तिने परत आल्यावर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
लग्नानंतर जास्तीत जास्त जोडपी हनीमूनसाठी एखाद्या हिल स्टेशनला जातात. इथे दोघेही सोबत वेळ घालवतात आणि एकमेकांना जाणून घेतात. पण अनेकदा काही कपलमध्ये हनीमूनवरच वाद होतात. एका महिलेने नुकताच तिचा हनीमूनचा अनुभव सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सांगितला. महिलेने सांगितलं की, त्यांच्यात एक असा वाद झाला ज्यामुळे तिने परत आल्यावर घटस्फोट घेण्याचा विचार केला. त्यांच्यात मतभेद एका अनोळखी तरूणीमुळे झाले होते, जी एकटीच फिरायला आली होती.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटचा ग्रुप r/TwoHotTakes वर महिलेने एक लांबलचक पोस्ट शेअर केली आणि तिने लोकांकडे सल्ला मागितला की, ती योग्य करत आहे की नाही? महिलेने लिहिलं की, तिचं वय ३० आहे तर तिच्या पतीचं वय २९ आहे. नुकतंच त्यांचं लग्न झालं आणि ते हनीमूनहून परतही आले आहेत. तिथे त्यांना एक २७ वर्षीय तरूणी भेटली होती जी सोलो ट्रॅव्हलर होती. पती-पत्नी दोघेही या तरूणीला बघून इम्प्रेस झाले होते. अशात बोलता बोलता पतीने नंतर पत्नीला सांगितलं की, त्याने त्या तरूणीच्या काही इन्स्टाग्राम स्टोरीजना लाइक केलं आणि त्या स्टोरीजवर कमेंट्सही केल्या. तसेच त्याने तिला मेसेजही केले होते. दोघेही यावर नंतर फार काही बोलले नाही. दोघांनी त्यांचा हनीमून एन्जॉय केला आणि घरी परत आले.
घरी परत आल्यावर जेव्हा महिलेने पत्नीचे मेसेज चेक केले तर तिला एकही मेसेज दिसला नाही. तिच्या लक्षात आलं की, पतीने मेसेज डिलीट केले. यावर तिला प्रश्न पडला की, मेसेजमध्ये असं काय होतं की, पतीने ते डिलीट केले? तिने पतीला याबाबत विचारलं तर तो म्हणाला की, मेसेज इतके महत्वाचे नव्हते आणि पत्नीला वाईट वाटू नये म्हणून त्याने ते मेसेज डिलीट केले. याचं तिला फार वाईट वाटलं आणि घटस्फोट घेण्याचा विचार केला. तिला परीवार किंवा मित्रांना याबाबत सांगायचं नव्हतं. त्यामुळे तिने सोशल मीडियावर लोकांकडे सल्ला मागितला. लोकांनी सुद्धा तिला वेगवेगळे सल्ले दिले. एक तर म्हणाला की, तू पतीला हे सांग की, मला रेडिटवर डिलीट झालेले मेसेज कसे परत बघता येतात हे समजलं, मग पतीचे हावभाव बघ.
महिलेने आपल्या पोस्टमध्ये अपडेट करून आणखी पुढील माहिती दिली. महिलेने सांगितलं की, तिच्या पतीने अनेक वेळा तिची माफी मागितली. पण नंतर महिलेने त्या तरूणीला संपर्क केला आणि तिला सगळं प्रकरण सांगितलं. तिच्याकडून मेसेजही मागवून घेतले. तरूणीने त्यांचं चॅटिंग पाठवलं देखील. खरंच त्या मेसेजमध्ये फार काही नव्हतं. हाल-चाल विचारपूस इतकेच ते मेसेज होते. पण महिला या गोष्टीने चिंतेत आहे की, पतीने मेसेज डिलीट का केले. ती असंही म्हणाली की, हनीमून दरम्यान पतीने असं काहीच केलं नाही ज्यावरून तिला त्याच्यावर संशय येईल. तिथून परत आल्यावरच तिचा संशय वाढला.