जबरदस्त! भारतात खऱ्याखुऱ्या 'बगीराचा' बिनधास्त वावर कॅमेरात कैद, पाहा व्हायरल फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 05:20 PM2020-07-06T17:20:30+5:302020-07-06T17:27:16+5:30
लॉकडाऊनच्या काळात खराखुरा ब्लॅक पॅंथर कर्नाटकात आढळून आला आहे.
आत्तापर्यंत तुम्ही सिनेमात ब्लॅक पँथर म्हणजेच बगिरा पाहिला असेल. खराखुरा बगिरा पाहिला नसेल तर आज आम्ही तुम्हाला एक व्हायरल फोटो दाखवणार आहोत. दुर्मिळ आणि तितकाच सुंदर फोटो कॅमेरात कैद करणं सगळ्यांनाच जमत नाही. स्वतःचा जीव धोक्यात घालून वाईल्ड लाईफ फोटोग्राफर असे फोटो मिळवतात. वाघ, बिबटे भारतात अनेक ठिकाणी दिसून येतात. व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून तुम्ही वाघ, बिबटे अनेकदा पाहिले असतील. पण लॉकडाऊनच्या काळात खराखुरा ब्लॅक पॅंथर कर्नाटकात आढळून आला आहे.
@earth या ट्विटर युजरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. भारताच्या कॅबिनी जंगलात फिरणारा ब्लॅक पॅथर असे या व्हिडीओला कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत २ लाखांपेक्षा जास्त लाईक्स आणि ५३ हजारांपेक्षा जास्त रिट्विटस मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत.
A black panther roaming in the jungles of Kabini, India. pic.twitter.com/UT8zodvv0m
— Earth (@earth) July 4, 2020
फोटोग्राफर Shaaz Jung याने इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. शाज हे निकॉन इंडीयाचे ब्रॅण्ड अम्बेसीडर आहेत. सोशल मीडियातील लोकही ब्लॅक पॅंथरचा हा सुंदर फोटो पाहून थक्क झाले आहेत. अनेकजण त्याला बगीरा म्हणत आहेत. तर अनेकांनी वेगवेगळ्या भावना व्यक्त केल्या आहेत. ५ लाख ८९ हजार फॉलोअर्स असलेले इंन्स्टाग्राम पेज आहे.
काळा बिबट्याही ब्लॅक पँथरप्रमाणेच असतो. पण त्यांच्यात फरक असतो. काळा बिबट्या ही बिबट्याची वेगळी जात नसते. कालिकण (मेलॅनीन) हे त्वचेतील रंगद्रव्य (पिगमेंट) जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे हे बिबटे काळे दिसतात, तर पांढऱ्या वाघाचा पांढरा रंग कालिकणाच्या अभावामुळे असतो. काळ्या बिबट्यांची त्वचा जवळून पाहिली असता, नेहमीचे ठिपके दिसतात.
'या' मंदिरात होते Royal Enfield Bullet ची पुजा; मंदिराची कहाणी वाचाल तर अवाक् व्हाल
हत्तीच्या पिल्लाचा 'हा' व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले; असं काय झालंय?, पाहा व्हायरल व्हिडीओ