बोंबला! पतीसोबतचा प्रायव्हेट व्हिडीओ चुकून आईला सेंट झाला, महिलेने सांगितला गुगलचा कारनामा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 03:21 PM2021-04-05T15:21:35+5:302021-04-05T15:30:51+5:30
कारा तिच्या पतीसोबत किचनमध्ये रोमान्स करत होती आणि बॅकग्राउंडला तिच्या मुलाचा एक फोटो फ्रीजवर लागलेला होता.
जगात टेक्नॉलॉजी फारच धोकादायक स्तरावर पोहोचली आहे. नुकतंच याचं एक उदाहरण कॅनडात बघायला मिळालं. सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव राहणारी ही महिला हैराण झाली कारण गुगलच्या एक अॅपने तिचा अॅडल्ट व्हिडीओ तिच्या आईला पाठवला. या महिलेने तिच्यासोबत घडलेली घटना एक व्हिडीओतून सांगितली.
कारा टोनीन नावाच्या या महिलेने टिकटॉकवर सांगितले की, तिने तिच्या फोनमध्ये एक फीचर घेतलं. या फीचरनुसार, काराच्या मुलाचे सर्व फोटो ऑटोमॅटिकली काराच्या आईच्या फोनवर सेंट होतात. पण हे फीचर तिच्यासाठी चांगलंच महाग ठरलं आहे.
कारा तिच्या पतीसोबत किचनमध्ये रोमान्स करत होती आणि बॅकग्राउंडला तिच्या मुलाचा एक फोटो फ्रीजवर लागलेला होता. गुगलने काराच्या मुलाचा तो बॅकग्राउंडला असलेला फोटो कॅप्चर केला. त्यानंतर कारा आणि तिच्या पतीचा रोमॅंटिक व्हिडीओ सुद्धा काराच्या आईला पाठवला.
कारा व्हिडीओत म्हणाली की, जर तुम्ही गुगल फोटो किंवा कोणत्याही फोटो अॅपचा वापर करत असाल ज्यात चेहरा ओळखण्याची क्षमता आहे तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे. गुगल फोटो एका शक्तीशाली सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चेहरे ओळखतो आणि यामुळे मला लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागला.
तेव्हापासून कारा हैराण झाली आहे. तिने टिकटॉक व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या आईची माफी मागितली आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १० लाख लोकांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलाय. अनेकजण काराचं बोलणं ऐकून हैराण झाले आहेत. त्यांनी अॅडव्हांस टेक्नीकबाबत चिंता व्यक्त केली आहे.