ए लिल्लू...ए बिल्लू...चलो टिका लगाओ! हरयाणवी भाषेतील हा Video नेटकऱ्यांची मनं जिकंतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 04:14 PM2022-01-23T16:14:31+5:302022-01-23T16:18:47+5:30

सध्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media Viral Video) खूप व्हायरल होत आहे. ही महिला परिसरातल्या मुलांना लस टोचून घेण्यासाठी लयबद्ध आवाजात हाका मारत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

woman calling for corona vaccination in funny way goes viral on social media | ए लिल्लू...ए बिल्लू...चलो टिका लगाओ! हरयाणवी भाषेतील हा Video नेटकऱ्यांची मनं जिकंतोय

ए लिल्लू...ए बिल्लू...चलो टिका लगाओ! हरयाणवी भाषेतील हा Video नेटकऱ्यांची मनं जिकंतोय

googlenewsNext

काही राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मुलांना कोरोनाचा, ओमिक्रॉनचा संसर्ग होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने १५ ते १८ वर्षं वयोगटातल्या मुलांसाठी लसीकरण (Vaccination Drive in India) अनिवार्य केलं आहे. या लसीकरणाच्या अनुषंगाने जनजागृती केली जात आहे. आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स प्रत्येक भागात जाऊन लसीकरण करत आहेत. यातच सध्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media Viral Video) खूप व्हायरल होत आहे. ही महिला परिसरातल्या मुलांना लस टोचून घेण्यासाठी लयबद्ध आवाजात हाका मारत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

सोशल मीडियावर मनोरंजक, विनोदी व्हिडीओंजचा खजिना पाहायला मिळतो. दररोज अशा व्हिडीओंची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हे व्हिडीओज व्हायरलही होतात. यापैकीच लसीकरणाच्या अनुषंगाने असलेला एका महिलेचा व्हिडीओदेखील नेटिझन्सचं मनोरंजन करत आहे.

इन्स्टाग्रामवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला लाखो Views मिळत आहेत. इतरही का प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.लसीकरणासाठी डॉक्टर गल्लीत पोहोचताच, तेथे उभी असलेली एक महिला त्या भागातल्या मुलांना मोठ्यानं हाका मारत असताना या व्हिडीओत दिसते. 'कोरोनाची लस घ्या...ए लिल्लू...ए बिल्लू...ए मंजू, अंजू, लीना चला सगळे लवकर या,' असं ही बोलताना दिसते. या व्हिडिओतली महिलेची लयबद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण भाषा आणि पद्धत नागरिकांना भलतीच आवडल्याचं दिसतं. या महिलेचा व्हिडrओ पाहताना नेटिझन्सना (Netizens) हसू आवरत नाही.

या व्हिडिओवर असंख्य नेटिझन्सनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, या महिलेचा आवाज आणि लय बघून, बादशाह यावर गाणं तयार करू नये म्हणजे मिळवलं.' दुसऱ्या एका युझरनं कमेंट करताना लिहिलं आहे, 'हरियाणवी लोकांची लेव्हल काही निराळीच आहे.

Web Title: woman calling for corona vaccination in funny way goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.