रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकच्या खाली आली महिला, पण साधं खरचंटलंही नाही! कसं? पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 05:48 PM2022-08-07T17:48:50+5:302022-08-07T18:03:39+5:30
एक थरकाप उडवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एक महिला धावत रोड क्रॉस करत असताना एका भरधाव ट्रकखाली आली. पण तिला साधं खरचटलंही नाही.
नैसर्गिक आपत्ती, मोठी दुर्घटना किंवा आजारपण ही मृत्यूसाठी कारणीभूत ठरणारी काही कारणं. पण बऱ्याचदा आपल्या चुकांमुळे, निष्काळजीपणामुळे किंवा बेजबाबदारपणामुळे आपण स्वतःहून मृत्यूला आमंत्रण देतो. असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एक महिला धावत रोड क्रॉस करत असताना एका भरधाव ट्रकखाली आली. पण तिला साधं खरचटलंही नाही.
रस्ता ओलांडताना काळजीपूर्वक ओलांडायचा असतो नाहीतर छोटीशीही चूक जीवावर बेतू शकते. हीच चूक या महिलेने केली. समोरून भरधाव ट्रक येत असतानाही पाहूनही तिने धावत रस्ता ओलांडायचा प्रयत्न केला. पण त्याच ट्रकखाली ती आली. तिचं नशीब बलवत्तर म्हणून तिला जीव वाचला. तिला साधं खरचटलंही नाही.
व्हिडीओत पाहू शकता एक महिला रस्ता क्रॉस करते आहे. पण रोड क्रॉस करताना समोरून ती एका ट्रकला येताना पाहते. ट्रक येण्याआधी जावं म्हणून ती रस्त्यावरून धावत सुटतो. ट्रक जवळ येताच तिचा पाय घसरतो, तोल जातो आणि ती त्या ट्रकखाली जाते. ट्रकखाली जाताच ती महिला फिरते आणि तिचं डोकं ट्रकखाली जाते.
जेव्हा ही महिला ट्रकखाली जाते तेव्हा ट्रकचं पुढील चाल पुढे गेलेलं असतं आणि मागील चाकाजवळ ही महिला असते चाक महिलेच्या डोक्यावरून जाणार तोच ट्रकचालक तात्काळ ब्रेक मारतो आणि महिलेच्या जवळ ते चाक पोहोचताच गाडी थांबते. ड्रायव्हरने लगेच ब्रेक मारल्याने या महिलेचा जीव वाचला आहे आणि ट्रकच्या चाकाखाली तिच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला असता.
Shocking Videos ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलं आहे. नशीबवान महिला असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. अवघ्या तीन सेकंदाच्या या व्हिडीओ सर्वांना धडकी भरवली आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने तर या महिलेला या दिवशी आपला दुसरा बर्थडे साजरा करायला हवा कारण तिला नवं आयुष्य मिळालं.
Lucky lady pic.twitter.com/eo9B9Rk4aM
— Shocking Videos (@ShockingClip) August 5, 2022
व्हिडीओत महिलेचीही चूक दिसून येते आहेत. रोड क्रॉस करताना तिने घाई केली. गाड्या येत असताना पाहूनही तिने धावत रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. तिचं नशीब बलवत्तर होतं म्हणून तिचा जीव वाचला. पण महिलेसारखं नशीब सर्वांचंच असेल असं नाही. किंवा प्रत्येकवेळी नशीब अशी साथ देईलच असं नाही त्यामुळे आपणच खबरदारी घ्यायला हवी. त्यामुळे तुम्ही रस्ता ओलांडताना चुकूनही अशी चूक करू नका.