Revealing Dress घातल्याने शेजाऱ्यांनी बोलवले पोलीस, महिला म्हणाली - मला कपडे निवडण्याचा हक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 10:32 AM2021-03-19T10:32:44+5:302021-03-19T11:02:55+5:30

इतकेच नाही तर पोलिसांनी महिलेसोबत बातचीत केली आणि महिलेनेही आपली बाजू मांडली. या महिलेचं नाव रोवी वेड आहे आणि तिने सोशल मीडियावर पूर्ण किस्सा सांगितला आहे. 

Woman claimes her neighbour calls cops to report her revealing dress | Revealing Dress घातल्याने शेजाऱ्यांनी बोलवले पोलीस, महिला म्हणाली - मला कपडे निवडण्याचा हक्क!

Revealing Dress घातल्याने शेजाऱ्यांनी बोलवले पोलीस, महिला म्हणाली - मला कपडे निवडण्याचा हक्क!

googlenewsNext

अमेरिकेला जगभरात खाण्यासाठी आणि कपड्यांसाठी फार स्वतंत्र देश म्हणून पाहिलं जातं. पण इथे नुकत्याच घडलेल्या एका घटनेने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. येथील एका महिलेचे कपडे तिच्या शेजारी राहणाऱ्या महिलेला पसंत पडले नाही. तर तिने पोलिसांना बोलवलं. इतकेच नाही तर पोलिसांनी महिलेसोबत बातचीत केली आणि महिलेनेही आपली बाजू मांडली. या महिलेचं नाव रोवी वेड आहे आणि तिने सोशल मीडियावर पूर्ण किस्सा सांगितला आहे. 

शेजारी महिलेला वाटला ड्रेस अधिक रिव्हिलींग

डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, रोवी वेडने सांगितले की, शेजारी राहणाऱ्या महिलेला तिचा ड्रेस रिव्हिलींग आणि इनप्रोपिएट वाटला नाही. इतकेच नाही तर त्या महिलेने रोवीसोबत भांडणं केलं आणि पूर्ण शरीर झाकलं जाईल असेल कपडे घालण्याचा सल्ला दिला. माझ्या शेजारी महिलेला हे माझे कपडे आवडले नाही. कारण तिला माझी स्टाइल पसंत नाही. माझी बॉडी पाहून तिला ईर्ष्या होते. मला मी सेक्सी दिसण्याचा पूर्ण हक्क आहे आणि मी असे कपडे घालत राहणार. वेड पोलिसांना म्हणाली की, मला खरंच माहीत नाही की, माझ्या शेजारी महिलेला माझ्यापासून काय अडचण आहे. 

सोशल मीडियावर लोकांनी केलं रोवीचं कौतुक 

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला ११ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. या व्हिडीओवर कमेंट करून लोकांनी रोवीचं कौतुक केलं आहे. रोवी वेडने सांगितले की, तिने पोलिसांसमोर आपलं मत मांडलं आणि त्यानंतर पोलीस तेथून निघून गेले.
 

Web Title: Woman claimes her neighbour calls cops to report her revealing dress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.