सलाम! रस्त्यावर बेशुद्ध पडली होती महिला, बाळ बाजूला रडत होतं; महिला कॉन्स्टेबलने केलं असं काम...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 03:42 PM2021-05-28T15:42:48+5:302021-05-28T15:43:38+5:30

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये एक महिला कॉन्स्टेबल भर रस्त्यात एका आधार नसलेल्या महिलेची मदत करताना दिसत आहे. हा नजाराला पाहून लोक भावूक झाले आहेत.

Woman constable help woman fell down on the roadside due to heat heart touching photo goes to viral | सलाम! रस्त्यावर बेशुद्ध पडली होती महिला, बाळ बाजूला रडत होतं; महिला कॉन्स्टेबलने केलं असं काम...

सलाम! रस्त्यावर बेशुद्ध पडली होती महिला, बाळ बाजूला रडत होतं; महिला कॉन्स्टेबलने केलं असं काम...

Next

जगात माणुसकीपेक्षा मोठी दुसरी गोष्ट नाही. सोशल मीडियावर अशा अनेक घटना समोर येत असतात. ज्या माणुसकीची उदाहरणं देत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोने सर्वांचच मन जिंकलं आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये एक महिला कॉन्स्टेबल भर रस्त्यात एका आधार नसलेल्या महिलेची मदत करताना दिसत आहे. हा नजाराला पाहून लोक भावूक झाले आहेत.

या फोटोत तुम्ही बघू शकता की, एक महिला कॉन्स्टेबल रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या महिलेला पाणी पाजत आहे. ज्यांनीही हा फोटो पाहिला ते सगळे भावूक झाले आहेत. असे सांगितले जात आहे की, हा फोटो उत्तर प्रदेशातील आहे. इथे कॉन्स्टेबलची नजर गरमीमुळे बेशुद्ध पडलेल्या महिलेवर पडली. या महिलेचा मुलगा बाजूला रडत होता. अशात महिला कॉन्स्टेबल लगेच तिच्याजवळ गेली आणि तिला पाणी पाजलं. तेव्हा महिला शुद्धीवर आली.

हा फोटो ट्विटरवर ‘SACHIN KAUSHIK' ने शेअर केला आहे. त्यांनी या फोटोसोबत कॅप्शन लिहिले की, 'आई गरमीने बेशुद्ध झाली आणि रस्त्याच्या कडेला प़डली. लहान बाळ बाजूला रडत आहे. ड्युटी करत असलेल्या रीनाची महिलेवर नजर प़डली. रीना महिलेला पाणी पाजलं. नंतर शुद्धीवर आल्यावर महिलेला घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली''.

या फोटोवर आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनीही कमेंट केली आहे. त्यांनी लिहिले की, 'कौतुकास्पद काम रीना. #ISaluteHer. हैराणी आणि दु:खाची बाब म्हणजे कोणत्याही स्थानिक व्यक्तीने येणाऱ्या जाणाऱ्याने या महिलेची मदत केली नाही'. हा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक महिला कॉन्स्टेबलचं भरभरून कौतुक करत आहेत.
 

Web Title: Woman constable help woman fell down on the roadside due to heat heart touching photo goes to viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.