वेगवेगळ्या ठिकाणाहून महिलेने दत्तक घेतली दोन मुले, दोघं निघाले भाऊ-बहीण!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 04:17 PM2019-01-15T16:17:39+5:302019-01-15T16:19:54+5:30
एखाद्या सिनेमाला शोभावी अशीच काहीशी घटना एक महिलेसोबत घडली आहे. या महिलेने दोन बाळांना दत्तक घेतलं....तेही वेगवेगळ्या जागेवरुन...
एखाद्या सिनेमाला शोभावी अशीच काहीशी घटना एक महिलेसोबत घडली आहे. या महिलेने दोन बाळांना दत्तक घेतलं....तेही वेगवेगळ्या जागेवरुन...नंतर काही दिवसांनी तिला कळाले की, हे दोन बाळ भाऊ-बहीण आणि एकाच आईचे आहेत. तेव्हा तिला धक्का बसला.
अमेरिकेतील कोलोराडो येथील ही घटना आहे. Katie Page नावाची ही एक सिंगल मदर आहे. ती तिच्या पतीपासून घटस्फोट घेऊन वेगळी झाली आहे. त्यानंतर तिने दोन बाळांना दत्तक घेतले आणि नव्या पद्धतीने लाइफ सुरु केली.
२०१६ मध्ये कॅटीला एका अनाथालयातून फोन आला. त्यांनी कॅटीला सांगितले की, इथे एका चार दिवसाच्या बाळाला सोडून गेलंय. कॅटी या बाळाला तिच्यासोबत घेऊन गेली. त्यानंतर कॅटी या बाळाच्या खऱ्या आई-वडिलांची बरेच दिवस वाट पाहिली. पण कुणी आलं नाही. अशावेळी कॅटीने कोर्टाकडून बाळाची संपूर्ण जबाबदारी घेतली आणि बाळाचं नाव Grayson असं ठेवलं.
आता कॅटीकडे ग्रोसन होता आणि त्याचा ती सांभाळ करत होती. कोर्टाची प्रोसेसही पूर्ण झाली होती. त्यानंतर दोन आठवड्यांनी पुन्हा एकदा कॅटीला एक फोन आला. यावेळी कुणीतरी एका मुलीला सोडून गेलं होतं. त्या मुलीलाही कॅटी घरी घेऊन आली. या मुलीचं नाव कॅटीने Hannah असं ठेवलं.
या मुलीला आणि मुलाला कॅटीने हॉस्पिटलमध्ये काही दिवस ठेवलं. तेव्हा दोघांच्याही ब्रेसलेटवरील नावात साम्य होतं. म्हणजे दोघांचीही आई एकच आहे असं समोर आलं. त्यानंतर आणखी माहिती काढून कॅटीने दोन्ही बाळांची आणि त्यांच्या खऱ्या आईची भेटही करुन दिली. आता २०१९ मध्ये कॅटी आणखी एका बाळाला दत्तक घेणार आहे.