बंजी जंपिंग तिच्या आयुष्यात ठरला शेवटचा खेळ, ८० फुटांवरुन खाली कोसळुन महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 01:55 PM2021-10-12T13:55:56+5:302021-10-12T14:11:10+5:30
एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात दिसतं, की एक महिला अॅडवेंचर खेळ खेळते. पण तिला कल्पनाही नसते की पुढे काय वाढुन ठेवलंय...
अनेक लोकांनी अॅडवेंचर गेम्स (Adventure Games) खेळायला भरपूर आवडतात. मात्र हेच खेळ काहीवेळा जीवावरही बेतू शकतात. अशा खेळांदरम्यान मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात दिसतं, की एक महिला अॅडवेंचर खेळ खेळते. पण तिला कल्पनाही नसते की पुढे काय वाढुन ठेवलंय...
कजाकिस्तानमध्ये (Kazakhstan) राहणारी ३३ वर्षीय येवजीनिया लिओन्तिया तीन मुलांची आई होती. दोन तिची मुलं होती तर तिसरा तिच्या नातेवाईकांचा मुलगा होता. ज्याचा सांभाळ तिच करायची. येवजीनिया आपल्या पती आणि मित्रांसोबत कारागांडा शहरातील एका हॉटेलमध्ये गेली होती. याच्या छतावर बंजी जंपिंग (Bungee Jumping) अॅडवेंचर गेम खेळला जातो. यात व्यक्तीच्या कमरेला रश्शी बांधली जाते आणि यानंतर या व्यक्तीला उंचावरून खाली सोडलं जातं. यानंतर व्यक्ती हवेतच या रस्सीच्या सहाय्याने लटकत राहातो. येवजीनियाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ती उंचावर उभी असून बंजी जंपिंग करताना दिसते. मात्र, तिच्यासोबत मोठी दुर्घटना घडते.
मिळालेल्या माहितीनुसार, तिचा पती व्हिडिओ शूट करत होता. ती छतावर दोरी बांधून उभा होती. अचानक तिनं खाली उडी घेतली मात्र दोरी व्यवस्थित नसल्यानं हवेत लटकण्याऐवजी ती थेट जमिनीवर कोसळली आणि एका भिंतीला जाऊन धडकली. खाली उपस्थित असलेल्या लोकांनी तिला वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला. ती जखमी झालेली होती. लगेचच तिला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं मात्र सर्जरीदरम्यानच तिचा मृत्यू झाला.
या महिलेनं याआधीही अनेकदा बंजी जंपिंग केली असल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हत्येच्या अँगलनंही पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बंजी जंपिंगच्या ऑर्गनायजर्सविरोधात केस दाखल करण्यात आली आहे. पोलिसांचं असं म्हणणं आहे, की ही रश्शी कमजोर होती तर त्याकडे दुर्लक्ष का केलं गेलं? उडी घेणाऱ्या व्यक्तीला दोन दोऱ्यांनी बांधलेलं असतं, मात्र यात एक दोरी तुटल्यानं ही मोठी दुर्घटना घडली.