स्कूटीने अंगणात स्टंट करणारी महिला धडामकन पडली, व्हिडीओ बघून पोट धरून हसाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 11:54 AM2021-12-04T11:54:30+5:302021-12-04T11:58:15+5:30
Social Viral : व्हिडीओत बघू शकता की घराच्या पार्कींगमध्ये दोन महिला स्कूटीवर बसून येतात. यावेळी त्या स्टंट करण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हाच धडामकन खाली पडतात.
सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच पोट धरून हसाल. इतकं की तुम्ही तुमचंच हसू रोखू शकणार नाहीत. व्हिडीओत एक महिला घराच्या आत स्कूटीवर स्टंट करण्याचा प्रयत्न करत होती. पण यावेळी असं काही होतं की, बघून लोकांना हसू आवरणंही कठीण झालं आहे.
व्हिडीओत बघू शकता की घराच्या पार्कींगमध्ये दोन महिला स्कूटीवर बसून येतात. यावेळी त्या स्टंट करण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हाच धडामकन खाली पडतात. व्हिडीओ इथेच संपत नाही तर यानंतर आणखी एक किस्सा घडतो. यानंतर त्यांना सांभाळण्यासाठी आलेला एक व्यक्तीही घसरून खाली पडतो.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, दोघींना उचण्यासाठी आलेला व्यक्तीही त्यांच्यावर जोरात पडतो. हा मजेदार व्हिडीओ black_lover__ox नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ लोकांना फारच आवडलाय. लाखो लोक व्हिडीओ लाइक करत आहेत.
सोबतच लोक व्हिडीओवर भरभरून कमेंट्सही करत आहेत. एका यूजरने व्हिडीओवर कमेंट करत लिहिलं की, 'स्टंट करण्याआधी खूप प्रॅक्टिस केली पाहिजे'. एकाने कमेंट केली की, 'तुम्ही एकटेच का पडले, मीही येतो'.