साप... साप ओरडत सुटली महिला अन् जवळ जाऊन पाहते तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 03:49 PM2019-10-05T15:49:43+5:302019-10-05T15:57:46+5:30
तुम्ही कधी साप पाहिला आहे का? आता तुम्ही म्हणाल असं काय विचारताय? साप कसा दिसतो हे जवळपास सर्वांनाच माहीत असतं. पण जर चुकून साप समोर आला तर आपोआप ओरडा-आरडा सुरू होतो.
तुम्ही कधी साप पाहिला आहे का? आता तुम्ही म्हणाल असं काय विचारताय? साप कसा दिसतो हे जवळपास सर्वांनाच माहीत असतं. पण जर चुकून साप समोर आला तर आपोआप ओरडा-आरडा सुरू होतो. एका फेसबुक यूजरचीही काहीशी अशीच रिअॅक्शन होती बरं का... फातिमा दाऊद नावाच्या एका फेसबुक यूजरने पार्किंगमध्ये सापाप्रमाणे दिसणारं काहीतरी पाहिलं आणि ओरडण्यास सुरुवात केली. 22 सप्टेंबरला फातिमा यांनी आपल्यासोबत घडलेली एका विचित्र घटनेबाबत फेसबुकवर पोस्ट करून सांगितलं. त्यासोबत त्यांनी एक फोटोही शेअर केला त्यामध्ये सापाप्रमाणे दिसणारं काहीतरी होतं.
फातिमा यांनी फोटो शेअर करताना असं लिहिलं आहे की, 'मी सर्वात आधी त्या वृद्ध महिलेची माफी मागते, जेव्हा मी ओरडत होती त्यावेळी त्या माझ्या बाजूला उभ्या होत्या. मी एखाद्या लहान मुलाप्रमाणे ओरडत होती. माझ्या ओरडण्यामुळे ती वृद्ध महिला पुरती घाबरून गेली होती. मला वाटलं जी गोष्ट मी पाहिली तो एक साप आहे आणि तो माझ्या दिसेने येत आहे. परंतु, ती एक खोट्या केसांची वेणी होती. जर कोणाची वेणी हरवली असेल तर तुम्ही ती तुम्हाला त्या ठिकाणी सापडेल.'
पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लोक फातिमा यांची खिल्ली उडवत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, 'मी अजुनही जोरात हसत आहे.' तसेच एका यूजरने लिहिलं की, 'ही आतापर्यंतची सर्वात मजेशीर घटना आहे.'
फातिमा दाऊद यांनी केलेली ही पोस्ट आतापर्यंत 2 हजारांपेक्षा जास्त लोकांनी शेअर केली असून जवळपास एक हजार लाइक्स मिळाले आहेत. एवढचं नाहीतर 100 पेक्षा जास्त कमेंट्सही आल्या आहेत.