मोबाईलमध्ये गुंग असणं तरुणीला पडलं चांगलंच महागात; घडली भयंकर दुर्घटना, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 03:32 PM2022-04-26T15:32:54+5:302022-04-26T15:36:59+5:30

Social Video : लोक रस्त्यावरून जातानाही मोबाईलचा वापर करत राहतात आणि अशावेळी अनेकदा ते अपघातालाही बळी पडतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

woman fell into water in mall while using mobile phone people laughed after see funny video | मोबाईलमध्ये गुंग असणं तरुणीला पडलं चांगलंच महागात; घडली भयंकर दुर्घटना, Video व्हायरल

मोबाईलमध्ये गुंग असणं तरुणीला पडलं चांगलंच महागात; घडली भयंकर दुर्घटना, Video व्हायरल

googlenewsNext

नवी दिल्ली - एक काळ असा होता जेव्हा लोकांना मोबाईल म्हणजे काय हे माहिती नव्हतं, पण आता स्मार्टफोन हा सर्वांच्याच जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. लोकांना त्याचं इतकं व्यसन लागलं आहे की त्यापासून स्वतःला दूर ठेवणं अशक्य आहे. मोबाईलचा शोध आजच्या काळात लोकांसाठी वरदान ठरू शकतो, पण हे व्यसन हळूहळू लोकांना आपल्या विळख्यात घेत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत लोक मानसिक आजारांना बळी पडू लागले आहेत.

लोक रस्त्यावरून जातानाही मोबाईलचा वापर करत राहतात आणि अशावेळी अनेकदा ते अपघातालाही बळी पडतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका महिलेला मोबाईल पाहणं चांगलंच महागात पडलं आहे. व्हिडीओमध्ये दिसतं की मोबाईलमध्ये महिला इतकी व्यस्त झाली आहे की तिला पुढे-मागे काहीच दिसत नाही. अशा स्थितीत चालत असताना ती अचानक मॉलमध्ये असलेल्या छोट्या कारंजाच्या पाण्यात पडते आणि ती पूर्ण भिजते.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा मजेशीर व्हिडिओ _true_love_jack नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 1 मिलियन म्हणजेच 10 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर 17 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केलं आहे आणि मजेदार कमेंट्स देखील केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं 'और खेलो पोकेमॉन गो'. तर दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'हा सेल फोन आपलं लक्ष विचलित करण्यासाठी सर्वात वाईट गोष्ट आहे'. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: woman fell into water in mall while using mobile phone people laughed after see funny video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.