Viral Video: बाबो! बाथरुममध्ये वळवळताना दिसला किंग कोब्रा अन् त्यानंतर जे झालं ते पाहुन बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 02:40 PM2022-02-14T14:40:33+5:302022-02-14T14:40:44+5:30
एक घटना थायलंडमधून समोर आली आहे. यात एका व्यक्तीच्या घरात साप शिरला. घरातील महिलेला बाथरूममध्ये हा साप दिसला.
आसपास साप दिसताच कोणीही धूम ठोकण्याचा आणि त्याच्यापासून लांब राहाण्याचा प्रयत्न करतं. साप जेव्हा उष्णतेने त्रस्त होतात, तेव्हा ते थंड जागेच्या शोधात बाहेर पडतात. अनेकदा तर या नादात साप लोकांच्या घरातही जाऊन बसतात आणि कोणाला याची चाहूलही लागत नाही. विशेष म्हणजे अनेकदा तर लोकांना प्रश्नच पडतो की हा साप घरात नेमका शिरला कुठून. सध्या अशीच एक घटना थायलंडमधून समोर आली आहे. यात एका व्यक्तीच्या घरात साप शिरला. घरातील महिलेला बाथरूममध्ये हा साप दिसला.
सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल (King Cobra Viral Video) होत आहे. यात सांगितलं गेलं आहे की थायलंडमध्ये एका घराच्या आत किंग कोब्रा साप बसलेला होता. जेव्हा महिला टॉयलेटचा वापर करण्यासाठी गेली तेव्हा
बाथरूममध्ये तिला साप दिसला. हे पाहून ती घाबरली आणि तिने घरातील सदस्यांना याबद्दल सांगितलं. घरातील लोकही सावध झाले आणि सापाला रेस्क्यू करण्यासाठी एक्सपर्टला बोलवण्यात आलं. एक्सपर्टने पाहिलं की बाथरूममधील टबच्या खाली थंड जागेत साप बसलेला आहे. (Cobra Snake in Bathroom)
सर्पमित्राने हा साप पकडायला सुरुवात केली. सुदैवाने या सापाने कोणालाही चावा घेतला नाही. सध्या थायलंडमध्ये अतिशय उष्ण वातावरण आहे. यामुळे साप थंड जागेच्या शोधात कुठेही पोहोचत आहेत. सुदैवाने हा विषारी सापाच वेळीच दिसला आणि लगेचच त्याला पकडण्यात आलं. हा व्हिडिओ ट्विटरवर 'नाउ दिस' नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ २१ हजारहून अधिकांनी पाहिला आहे.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, 'थायलंडमध्ये एक महिला आपल्या बाथरूममध्ये विशालकाय साप पाहून हैराण झाली. सुदैवाने सर्पमित्राने या किंग कोब्राल सुरक्षितपणे बाहेर काढलं. असं सांगितलं जातं आहे की थायलंडमध्ये सध्या उष्णता असल्याने हा साप थंड जागेच्या शोधात इथे पोहोचला होता.
A woman in Thailand was shocked to discover a giant snake in her bathroom. Luckily, animal experts were able to safely remove the reptile. It’s believed the snake was looking for a place to cool off from Thailand’s current high heat. pic.twitter.com/ZtNpegBB1Q
— NowThis (@nowthisnews) February 11, 2022