8 फुटांच्या अजगराने दिला होता महिलेच्या मृतदेहाला विळखा; घरातही सापडले 140 साप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 05:10 PM2019-11-01T17:10:01+5:302019-11-01T17:11:09+5:30
महिलेच्या मृतदेहाला साधारणतः 8 फुटांचा अजगर विळखा घालून बसला होता. एवढचं नाहीतर महिलेच्या घरात 140 इतर सापही आढळून आले.
अमेरिकेतील इंडियानामध्ये एका 36 वर्षीय महिलेचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आला. सर्वात हैराण करणारी गोष्ट म्हणजे, महिलेच्या मृतदेहाला साधारणतः 8 फुटांचा अजगर विळखा घालून बसला होता. एवढचं नाहीतर महिलेच्या घरात 140 इतर सापही आढळून आले. असं सांगितलं जात आहे की, अजगर महिलेच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीचा आहे.
बुधवारी आढळून आला मृतदेह
महिलेचं नाव लॉरा हर्स्ट असं सांगितलं जात आहे. इंडियाना स्टेट पोलिसांचे प्रवक्ता सर्जेंट किम रायली यांनी सांगितलं की, 'महिला राहत असलेल्या घरात अनेक साप आढळून आले. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या काउंटी शेरिफ डॉन मुनसन यांनी लॉराचा मृतदेह बुधवारी संध्याकाळी पाहिली. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. मुनसन यांच्याकडे सापाच्या अनेक प्रजातींचं कलेक्शन आहे. लॉरानेही आपल्या अपार्टमेंटमध्ये काही साप ठेवले होते.'
ऑप्टोसी रिपोर्ट
जेव्हा पोलीस त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा लॉरा जमिनिवर उभी होती आणि तिच्या गळ्यात एक 8 फुटांचा अजगर विळखा घालून बसला होता. तिथे पोहोचलेल्या डॉक्टरांनी सापाचा विळखा सोडवला पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. रिपोर्टमधून लॉराच्या मृत्यूचं खरं कारण उघडकीस आलं होतं.
श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याची शंका
सर्जेंट रायली यांनी सांगितले की, 'सुरुवातीच्या चौकशीमधून असं सिद्ध होत आहे की, लॉरावर अजगराने हल्ला केला आहे. परंतु, जोपर्यंत ऑटोप्सी रिपोर्ट येत नाही. तोपर्यंत आम्ही काहीच सांगू शकत नाही.' रायलीने हे सांगितलं की, त्या घरात 140 साप होते. ज्यापैकी 20 साप लॉराने स्वतः खरेदी केले होते.
तेव्हा होता 13 फुट लांब साप
एका स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या रिपोर्टनुसार, काउंटी शेरिफ डॉन मुनसन साप पाळण्याचा व्यवसाय करत होते. 2001मध्ये त्यांना जवळच असणाऱ्या एका शाळेत प्रमुख अतिथी म्हणून बोलावलं होतं. जिथे त्यांनी एका 13 फुटांच्या अजगराचं प्रदर्शन केलं होतं. मुनसन यावेळी स्थानिय काउंटी शेरिफच्या ऑफिसमध्ये डिप्टी पदावर कार्यरस आहे. त्यांनी 2001मध्ये शाळेच्या कार्यक्रमात मुलांना सांगितलं होतं की, त्यांच्या घराच्या गॅरेजमध्ये 52 साप आहेत. सध्या पोलीस चौकशी करत असून अद्याप लॉराच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालेलं नाही.