सिंहाच्या पिंजऱ्यात उडी मारुन म्हणाली, I Love U; पतीनं बनवला व्हिडीओ, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 06:00 PM2021-11-14T18:00:18+5:302021-11-14T18:00:33+5:30
न्यूयॉर्कच्या ब्राँक्स प्राणी संग्रहालयातील ही विचित्र घटना सगळ्यांसाठी चर्चेचा विषय बनली आहे.
न्यूयॉर्क – अमेरिकेच्या प्राणी संग्रहालयात एका महिलेचा जीवघेणा प्रकार पाहून सगळेच हैराण झाले. महिलेच्या या अजब प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या महिलेचं कृत्य मोबाईलमध्ये कैद करणारा दुसरं कोणी नसून या महिलेचा पती आहे. बायको करत असलेला स्टंट पाहून पतीने रोखण्याऐवजी तिचा व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. त्याने पत्नीला थांबवलंही नाही.
न्यूयॉर्कच्या ब्राँक्स प्राणी संग्रहालयातील ही विचित्र घटना सगळ्यांसाठी चर्चेचा विषय बनली आहे. या महिलेने सिंहाला पाहून त्याच्या पिंजऱ्यात बेधडक उडी मारली. तिचा हा प्रकार सगळेच शॉक झाले. पण त्यानंतर या महिलेने केलेले कृत्य भलतचं चर्चेत आलं. या महिलेने गुलाब दाखवून सिंहाला म्हणत होती, “I Love you, I Come back for u” असं ही महिला म्हणाली. महिलेचा पती लांबून हा व्हिडीओ शूट करत होता. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यापासून खूप जणांनी हा व्हायरल केला. त्यानंतर प्राणी संग्रहालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
या व्हिडीओ महिला लाल रंगाच्या ड्रेसमध्ये गुलाब हातात घेऊन सिंहासमोर उभी असल्याचं पाहायला मिळतं. या महिलेने याआधीही अशी करकुत केली आहे. महिलेच्या पतीने बनवलेल्या व्हिडीओत ती सिंहाशी बोलत असल्याचं रेकॉर्ड झालं आहे. त्यानंतर दातात नोट दाबून सिंहासमोर डान्स करायला लागते. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही लोकांनी दावा केला आहे की, या महिलेने यापूर्वीही असं कृत्य केले आहे. २०१९ मध्ये प्राणी संग्रहालयात तिने सिंहाच्या पिंजऱ्यात उडी घेत त्याच्यासमोर डान्स केला होता.
प्राणी संग्रहालय करणार कारवाई
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, या घटनेनंतर प्राणी संग्रहालयाकडून अधिकृत प्रतिक्रिया आली आहे. त्यात म्हटलं आहे की, ती महिला सिंहापासून खूप दूर होती. जेव्हा महिलेने सिंहाच्या पिंजऱ्यात उडी घेतली तेव्हा तेथील लोकांनी तात्काळ सुरक्षा रक्षकांना याची माहिती दिली. परंतु जोपर्यंत सुरक्षा रक्षक तिच्या मदतीसाठी पोहचतील तोवर महिला बाहेर आली होती. परंतु या महिलेने केलेले कृत्य पाहता तिला आणि तिच्या पतीविरोधात कारवाई केली जाणार आहे.