पती परदेशात पैसा कमवायला गेला, पत्नीला लॉटरी लागली अन् दुसऱ्यासोबत फरार झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 05:08 PM2023-03-21T17:08:10+5:302023-03-21T17:10:54+5:30
पती बाहेरच्या देशात पैसा कमावण्यासाठी जातो, पत्नी आणि कुटुंबीय मात्र देशातच राहतात.
पती बाहेरच्या देशात पैसा कमावण्यासाठी जातो, पत्नी आणि त्याचे कुटुंबीय मात्र देशातच राहतात. पती एकदा बाहेरच्या देशात गेल्यानंतर तो एक वर्ष परत येत नव्हतो, पती दर महिन्याला कुटुंबासाठी पैसे पाठवत होता. पत्नीला लॉटरी लावण्याची सवय होती. पत्नीला प्रत्येकवेळी लॉटरीमध्ये अपयश येत होते. एक दिवस मात्र पत्नीला तब्बल तीन कोटी रुपयांची लॉटरी लागते, लॉटरीचे पैसे येतात पण पत्नी वेगळच पाऊल उचलून दुसऱ्याच व्यक्तीसोबत पळून जाते. या प्रकरणाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
लॉटरी जिंकल्यानंतर पत्नीचे मत बदलले आणि तिने आपल्या पतीला सोडून एका पोलीस अधिकाऱ्याशी लग्न केले. हे प्रकरण थायलंडचे आहे, महिलेने ३ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आणि ती तिच्या पतीपासून बरेच दिवस लपवत होती. शेवटी तिने दुसऱ्याशी लग्न केल्याचे समोर आले आहे.
Video - आयुष्याचा नेमच नाही! 'बस आज की रात है जिंदगी' गाण्यावर नाचताना अधिकाऱ्याचा मृत्यू
४७ वर्षीय नरिनने वकील नारोंग कैफेत यांची भेट घेतली आणि ११ मार्च रोजी आपल्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला. नरिनचा २० वर्षांपूर्वी चैवानशी विवाह झाला होता. नरिनची पत्नी चॅविवान सांगते की, तिचे तिच्या पतीसोबत अनेक वर्षांपूर्वी ब्रेकअप झाले होते, म्हणजेच लॉटरी लागण्यापूर्वीच ते वेगळे झाले होते. यानंतर महिलेने पोलीस अधिकाऱ्याशी लग्न केले.
नरिनने पत्नीसोबतच्या ब्रेकअपबाबत कोणतीही माहिती नसल्याचा दावा केला असला तरी. आमच्या कुटुंबावर २ मिलियन बाथचे कर्ज आहे, जे सुमारे ३ कोटी रुपये आहे. अशा परिस्थितीत या संकटाचा सामना करण्यासाठी तो २०१४ मध्ये कमाईच्या उद्देशाने दक्षिण कोरियाला गेला होता. तो कुटुंबासह गेला, पण त्याची पत्नी थायलंडला परतली. यादरम्यान नरिन कुटुंबाच्या मदतीसाठी दरमहा २७ ते ३० हजार रुपये ट्रान्सफर करत होते.
काही दिवसांनी नरिनला याला त्याच्या मुलींमार्फत समजले की, त्याच्या पत्नीने लॉटरी जिंकली आहे. यानंतर त्याने पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न केला.पण पत्नीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. अखेर ३ मार्च रोजी तो थायलंडला परतला आणि त्याच्या पत्नीने २५ फेब्रुवारीलाच दुसऱ्याशी लग्न केल्याचे समजले. नरिनन थाई म्हणाला की, 'मला धक्का बसला आणि काय करावे ते समजत नव्हते. मी निराश आहे लग्नाला २० वर्षे झाली तरी माझी बायको अशी वागेल याची मला कल्पना नव्हती. मी दर महिन्याला कुटुंबाला पैसे पाठवत होतो. म्हणूनच माझ्या खात्यात आता फक्त ६० हजार बाथ आहेत. न्यायासाठी आणि आवश्यक रकमेसाठी मी गुन्हा दाखल केला आहे.