अरे बापरे! अगोदर बाहुलीशी लग्न केलं, आता महिलेने केला गर्भवती असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 05:26 PM2023-04-15T17:26:49+5:302023-04-15T17:28:18+5:30

तिच्या या दाव्यामुळे ही महिला पुन्हा चर्चेत आली आहे.

woman married to doll and now shares a video of her pregnancy netizens reacted | अरे बापरे! अगोदर बाहुलीशी लग्न केलं, आता महिलेने केला गर्भवती असल्याचा दावा

अरे बापरे! अगोदर बाहुलीशी लग्न केलं, आता महिलेने केला गर्भवती असल्याचा दावा

googlenewsNext

एका महिलेने बाहुलीशी लग्न केल्याची चर्चा गेल्या वर्षी झाली होती. पण आता महिलेने दावा केला आहे की, ती गर्भवती आहे आणि लवकरच तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहे. आता तिच्या या दाव्यामुळे ही महिला पुन्हा चर्चेत आली आहे. या दाव्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

ब्राझीलची रहिवासी असलेली मिरिव्हॉन रोचा मोरेस आधी तिच्या अनोख्या लग्नामुळे चर्चेत आली होती आणि आता या महिलेचा दावा आहे की ती आई होणार आहे. या महिलेने गेल्या वर्षीच एका बाहुलीसोबत लग्न केले होते.

रेल्वे प्रवासात पाहू नका अश्लील चित्रपट; रेल्वेची प्रवाशांना महत्त्वाची सूचना

तिच्या लग्नात अनेक चढ-उतार आले. मात्र, आता सर्व त्रास संपला आहे. महिलेने सांगितले की, मी खूप आनंदी आहे कारण मी मार्सेलोसोबत पुन्हा एकदा गर्भवती झाली आहे. आम्ही मुलीच्या जन्माची वाट पाहत आहोत आणि खूप आनंदी आहोत, असंही तिने सांगितले.

महिलेने टिकटॉकवर तिच्या प्रेगन्सी माहिती दिली. महिलेने पोस्ट केलेला व्हिडीओ ४ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. महिलेने व्हिडिओमध्ये टेस्टिंग किटचा निकाल दाखवला. 

सोशल मीडियावर महिलेची पोस्ट पाहिल्यानंतर एका यूजरने म्हटले की, अभिनंदन, तुम्ही यासाठी पात्र आहात. दुसऱ्याने सांगितले की, या महिलेला मदतीची गरज आहे. हा वेडेपणा आहे. गेल्या वर्षी बाहुलीसोबत लग्न झाल्यावर ही महिला प्रसिद्धीझोतात आली होती. मात्र, त्यानंतर महिलेने एक विचित्र विधान केले आणि आपण आपली फसवणूक करत असल्याचेही सांगितले. मात्र आता पुन्हा एकदा महिलेने तिच्या प्रेग्नेंसीची बातमी देऊन सर्वांनाच हैराण केले आहे.

Web Title: woman married to doll and now shares a video of her pregnancy netizens reacted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.