Woman on Solo Honeymoon: 37 व्या वर्षीही आहे सिंगल, एकटीच 'हनीमून'वर निघाली तरुणी; पाहा फोटो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 16:18 IST2023-03-20T16:13:53+5:302023-03-20T16:18:28+5:30
Woman on Solo Honeymoon: 37 वर्षीय एलिन म्हणते की, आयुष्यात आनंदी राहण्यासाठी कोणाचीही गरज नाही.

Woman on Solo Honeymoon: 37 व्या वर्षीही आहे सिंगल, एकटीच 'हनीमून'वर निघाली तरुणी; पाहा फोटो...
सोशल मीडियावर एका तरुणीची चांगलीच चर्चा होत आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेली ही तरुणी एकटीच हनीमूनवर निघाली आहे. स्वतःला खुश ठेवण्यासाठी पुरुषांवर अवलंबून राहणे सोडले असल्याचे मत त्या तरुणीचे आहे. ब्रिटनी ॲलिन असे या तरुणाचे नाव आहे. ती यापूर्वी लंडनमध्ये फिरायला गेली होती, आता तिला फ्रांस आणि इटलीला फिरायला जायचे आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, एलिन म्हणते ती, प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ येते, जेव्हा शारिरीक गरज भासते. पण, यासाठी तिला कधीच लग्नाचा दबाव घ्यायचा नाहीये. खरे प्रेम असेल तर कोणत्याही वयात लग्न करता येते आणि आयुष्यभर आनंदी राहता येते, असे एलिन म्हणते. एलिनचे सर्वाधिक काळ चाललेले रिलेशन पाच वर्षांचे होते.
आई-वडील साथ देतात
एलिनचे आई-वडील नेहमी तिच्या पाठिशी उभे असतात. ते म्हणथात की, आयुष्यात आनंदी राहण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे. एलिनचे आई-वडील म्हणतात, लग्न आणि मुलं खूप मोठी गोष्ट आहे, पण हे परमनन्ट सोलूशन नाही. आयुष्यात आनंदी राहण्यासाठी लग्न करावेच असे नाही. हायस्कूलमध्ये असताना एलिनचे ब्रेकअप झाले होते, त्यानंतर ती फिरायला गेली. तेव्हापासून तिला फिरण्याचीही आवड निर्माण झाली. आता ती 37 वर्षांची आहे आणि अनेक ठिकाणी एकटीच फिरायला जाते. ती आफल्या इंस्टाग्रामवर ट्रॅव्हल व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते.