महिलेने बहिणीसाठी ऑर्डर केला होता केक, केक पाहून पोटधरून हसली; जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 12:43 PM2024-05-02T12:43:36+5:302024-05-02T12:44:26+5:30
बेकरी स्टाफने महिलेच्या सूचना इतक्या शब्दश: पाळल्या की, केकवर आयसिंगने 'हॅप्पी बर्थडे स्टिक' लिहिलं होतं.
अनेकदा ऑनलाईन ऑर्डर केल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी जेव्हा घरी पोहोचता तेव्हा बऱ्याच फनी घटनाही घडतात. एका महिलेने बहिणीच्या वाढदिवसासाठी एक ऑर्डर केला होता. पण जेव्हा त्यांनी केक बॉक्समधून काढला तेव्हा जे दिसलं ते पाहून त्यांनाही हसू आवरलं नाही आणि तुम्हालाही आवरणार नाही. बेकरी स्टाफने महिलेच्या सूचना इतक्या शब्दश: पाळल्या की, केकवर आयसिंगने 'हॅप्पी बर्थडे स्टिक' लिहिलं होतं.
'@lin_and_greens' नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर महिलेने केक आणि बिलाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो बघून सगळेच अवाक् झालेत. बिलावर स्पष्टपणे काही सूचना दिल्या होत्या. बेकरीवाल्यांना केस ऑर्डर करताना सांगण्यात आलं होतं की, 'कृपया सोबत Happy Birthday Stick सुद्धा पाठवला'. पण बेकरीच्या स्टाफने याचा वेगळाच अर्थ काढला.
स्विगी इंडिया (Swiggy India) ला पोस्टमध्ये टॅग करत महिलेने लिहिलं की, ''हॅप्पी बर्थडे स्टिक' हे काय आहे भौ? हा माझ्या लहान बहिणीचा वाढदिवस होता आणि आम्ही अर्ध्या रात्री एका छोटा केक ऑर्डर केला होता. कारण आम्ही केवळ तीन लोक होतो. आम्ही विचार केला होता की, आम्ही केकवर काहीच लिहिणार नाही. कारण 200 ग्रामच्या केकवर लिहिण्यासाठी पुरेशी जागा राहणार नाही'.
महिलेने गंमतीने पोस्ट कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'याचकारणाने आम्ही सूचना बॉक्समध्ये लिहिलं होतं की, 'कृपया हॅप्पी बर्थडे स्टिक सुद्धा पाठवाल'. आम्हाला वाटलं आम्ही तिला सरप्राइज देत आहोत, पण त्याऐवजी स्विगीनेच आम्हाला सरप्राइज दिलंय'.
झालेल्या गैरसमजावर विचार करत तिने मान्य केलं की, 'मला नव्हतं माहीत की, याला केक टॉपर म्हटलं जातं. नंतर माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितलं'. असं होऊनही त्यांनी हे गंमतीने घेतलं आणि म्हणाली की, यातून तिला कुणाला दोष नाही द्यायचाय. ही एक चूक आहे आणि चला सगळे मिळून हसू'.
पोस्ट शेअर करण्यात आल्यापासून याला इन्स्टावर 63 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. यूजरही त्यांच्यासोबत घडलेल्या अशा घटनांबाबत कमेंट करत आहेत.