बाई गं...! स्वत:चा घाम विकून कोट्याधीश बनली महिला, वर्षाची कमाई वाचून उडेल झोप!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 01:08 PM2024-10-30T13:08:32+5:302024-10-30T13:09:45+5:30

एक महिला तिचा घाम विकून कोट्याधीश बनली आहे. यातून तिची वर्षाची कमाई वाचाल तुम्ही झोप उडाल्याशिवाय राहणार नाही.

Woman quit job became millionaire by selling online sweat | बाई गं...! स्वत:चा घाम विकून कोट्याधीश बनली महिला, वर्षाची कमाई वाचून उडेल झोप!

बाई गं...! स्वत:चा घाम विकून कोट्याधीश बनली महिला, वर्षाची कमाई वाचून उडेल झोप!

सामान्यपणे मेहनतीने कमावलेल्या पैशांना घामाची कमाई किंवा घाम गाळून कमावलेला पैसा असंही म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात कुणीही आपला घाम विकून पैसे कमावलेले नसतात. मात्र, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, एक महिला तिचा घाम विकून कोट्याधीश बनली आहे. यातून तिची वर्षाची कमाई वाचाल तुम्ही झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. आजकाल बरेच लोक विचित्र कामे करून पैसे मिळवू लागले आहेत. 

अमेरिकेच्या मॅटलॉक, डर्बीशायरमध्ये राहणाऱ्या महिलेबाबतही हेच सांगता येईल. ही महिला आधी एका कॉफी शॉपमध्ये नोकरी करत होती. पण आता या महिलेने  नोकरी सोडून स्वत:चा घाम ऑनलाईन विकणं सुरू केलं आहे. हैराण करणारी बाब म्हणजे घाम विकून ती कोट्याधीश बनली आहे.

एलेक्सिया ग्रेस असं या 25 वर्षीय महिलेचं नाव आहे.  एलेक्सियाने सांगितलं की, ती आधी बरिस्ता कॉफी शॉपमध्ये नोकरी करत होती. पण नोकरी सोडून तिने ऑनलाईन मॉडेलिंग सुरू केलं. त्यानंतर तिने एक अजब बिझनेस सुरू केला. तो म्हणजे स्वत:चा घाम विकणे. एलेक्सियाने सांगितलं की, नोकरी सोडल्यानंतर ओन्लीफॅन्स जॉईन केलं. ज्यावर ती तिचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ शेअर करत होती. सुरूवातीला जास्त पैसे मिलत नव्हते. मग तिने घाम विकणं सुरू केलं. घामाच्या एका बॉटलसाठी ती ४३ लाख ६७ हजार रूपये घेते.

एलेक्सियाने हेही सांगितलं की, तिचे फॅन्स तिला लाखो रूपयांचे गिफ्टही देतात. नुकतीच तिने एक BMW कार खरेदी केली. याआधी तिने एक मर्सिडिज कार खरेदी केली होती. एका फॅन्सने तिला कार घेण्यासाठी ६४ लाख रूपये पाठवले होते. 

स्वत:चा घाम विकून कोट्याधीश बनलेल्या या मॉडलने सांगितलं की, या बिझनेसमधून ती वर्षाला १ कोटी ३१ लाख रूपये कमाई करू लागली. आता तर यातही आणखी वाढ झाली आहे. ती म्हणाली की, तिचं लाइफ आता आधीपेक्षा खूप जास्त चांगलं आहे. तिला नोकरी करण्याची गरज नाही.

Web Title: Woman quit job became millionaire by selling online sweat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.