लवकर झोप येण्यासाठी महिलेने सांगितली एक खास ट्रिक, केवळ २ मिनिटात लागेल गाढ झोप!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 05:04 PM2024-10-28T17:04:31+5:302024-10-28T17:05:44+5:30
Sleeping Trick : झोप येण्यासाठी लोक औषधांचं सेवन करतात. पण त्यानेही आरोग्य बिघडतं. अशात सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Sleeping Trick : आजकाल कामाचा वाढता तणाव, फोन-टिव्हीचा अधिक वापर, झोपेची वेळ फिक्स नसणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे अनेकांना झोप न लागण्याची समस्या होते. जगभरातील लोक या समस्येने पीडित आहेत. तासंतास बेडवर पडून राहूनही अनेकांना झोप येत नाही. ज्यामुळे नंतर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात.
झोप येण्यासाठी लोक औषधांचं सेवन करतात. पण त्यानेही आरोग्य बिघडतं. अशात सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात तिने लवकर झोप लागण्यासाठी एक रामबाण उपाय सांगितला आहे. हा उपाय केल्यावर तुम्हाला २ मिनिटात गाढ झोप लागेल.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, टिकटॉकवर एमिली नावाच्या एका यूजरने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्याला आतापर्यंत १८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओत एमिलीने लवकर झोप येण्यासाठी एक ट्रिक सांगितली आहे.
हॅप्पी बेड्स नावाच्या एका कंपनीने स्लीप एक्सपर्ट रेक्स इस्पा यांनी ही ट्रिक बरोबर असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, आकडे मोजून झोपण्याचा प्रयत्न करण्याऐवजी या टेक्नीकचा वापर करणं कधीही चांगलं होईल.
झोप लागण्याची ट्रिक
महिलेने ही ट्रिक कशी वापरायची याबाबत सांगितलं की, सगळ्यात आधी बेड झोपा, मोठा श्वास घ्या. नंतर तुमच्या मनात एका अशा घराचा विचार करा जे तुमच्या घरासारखं दिसत असेल, पण तुम्ही राहता ते घर असू नये. एमिली म्हणाली की, ती तिच्या आजीच्या घराचा नेहमीच विचार करते. यानंतर घरासंबंधी प्रत्येक छोट्या गोष्टींचा विचार करायचा आहे. जसे की, दरवाजा उघडून आत जाणे, आजूबाजूला वस्तू दिसणे, फर्नीचर, टेबल साहित्य. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी ज्या एमिलीने आजीच्या घरात पाहिल्या. तिचं मत आहे की, ती घराच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचूनही शकत नाही की, तिला झोप येऊ लागते आणि ती झोपते.
एक्सपर्ट म्हणाले बेस्ट आहे हा उपाय
स्लीप एक्सपर्ट रेक्सने सांगितलं की, या पद्धतीने आपल्या विचारांवर आपण लक्ष केंद्रीत करतो. यात शरीर रिलॅक्स राहतं आणि कॉगनेटिव डिस्ट्रॅक्शन म्हणजे इतर सगळे विचारांपासून मेंदू स्वत:ला वेगळं करतो. या सगळ्या गोष्टी चांगल्या झोपेसाठी गरजेच्या असतात. तुमचं जुनं घर किंवा आजीचं घर, आजोबांच्या घरासोबत आपलं कनेक्शन असतं आणि सहजपणे त्याबाबत आपण विचार करू शकतो. ज्या ठिकाणासोबत तुमचं भावनिक नातं जुळलेलं असतं आणि अशा ठिकाणाबाबत तुम्ही विचार केला तर दिवसभराचा सगळा त्रास, ताण विसरून मन त्या घरातील बारीक-सारीक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करतं. आपल्या विचारांमध्ये रूममध्ये पुढे जात राहणं गरजेचं आहे. नाही तर मेंदू एकाच ठिकाणी थांबेल, अशात तुम्हाला झोप लागणार नाही.