विमानात झोपून राहिली महिला, डोळे उघडल्यावर जे पाहिलं त्याने उडाली आता झोप!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 04:19 PM2019-06-25T16:19:30+5:302019-06-25T16:25:45+5:30

सोशल मीडियावर विमानात होत असलेल्या वेगवेगळ्या घटना नेहमीच व्हायरल होत राहतात. अशीच एक एअर इंडियातील घटना सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरली होती.

Woman sleep in flight and then wake up in a dark share her terrible story on Facebook | विमानात झोपून राहिली महिला, डोळे उघडल्यावर जे पाहिलं त्याने उडाली आता झोप!

विमानात झोपून राहिली महिला, डोळे उघडल्यावर जे पाहिलं त्याने उडाली आता झोप!

googlenewsNext

(Image Credit : Pexels.com)

सोशल मीडियावर विमानात होत असलेल्या वेगवेगळ्या घटना नेहमीच व्हायरल होत राहतात. अशीच एक एअर इंडियातील घटना सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरली होती. आता एक वेगळीच घटना व्हायरल झाली आहे. विचार करा की, एका मोठ्या फ्लाइटमध्ये तुम्ही एकटेच बसलेले असता आणि संपूर्ण अंधार असतो, कसं वाटेल तुम्हाला?

ही कल्पना नाही तर एक सत्य घटना आहे. एक महिला एअर कॅनडा फ्लाइटने टोरांटोला जात होती. यादरम्यान ही घटना घडली. महिला फ्लाइटमध्ये झोपली होती आणि जेव्हा ती बऱ्याच झोपेतून जागी झाली तेव्हा प्लेन पूर्णपणे रिकामं होतं आणि नुसता अंधार होता.

(Image Credit : pexels.com)

तसेच प्लेन टोरांटो इंटरनॅशनल एअरपोर्टच्या पार्किंगमध्ये उभं होतं आणि बंद होतं. या घटनेबाबत महिलेने तिच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट लिहिली आहे. महिलेने लिहिले की, 'मी जवळपास अर्ध्या रात्री उठली. आत भयंकर थंडी होती आणि काळाकुट्ट अंधार होता. ती तिच्या सीटवर फसलेली होती. मी सांगू नाही शकत की, माझ्यासाठी तो क्षण किती भयावह होता. असं वाटत होतं की, मी एखादं स्वप्न बघत आहे. कारण त्यावेळी मला हे लक्षात येत नव्हतं की, हे सगळं कसं होत आहे'.

महिलेने पुढे सांगितले की, त्यावेळी तिचा फोन चार्ज नव्हता आणि ती मदतीसाठी कॉलही करू शकत नव्हती. नशीब की, महिलेला प्लेनच्या कॉकपिटमध्ये टॉर्च मिळाली. टॉर्चच्या मदतीने ती प्लेनच्या दरवाज्यापर्यंत पोहोचली. महिलेने दरवाजा तर उघडला पण ती त्यावेळी जमिनीपासून ५० फूट उंचीवर होती. तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता. अशात ती दरवाजात बसली आणि टॉर्चने ती तिथे असल्याचा इशारा देत होती.

(Image Credit : pexels.com)

दरम्यान, काही वेळाने एका एअरपोर्ट कर्मचाऱ्याची नजर तिच्यावर पडली आणि त्याने तिला सुरक्षित खाली उतरवलं. या धक्कादायक घटनेनंतर एअर कॅनडाने महिलेची माफी मागितली. महिलेने सांगितले की, ती या घटनेने इतकी घाबरली आहे की, तिला झोपही येत नाहीये.

Web Title: Woman sleep in flight and then wake up in a dark share her terrible story on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.