बाप रे बाप! बुर्ज खलिफाच्या टॉपवर उभं राहून महिलेने शूट केली जाहिरात, व्हिडीओ पाहून उडेल थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 03:40 PM2021-08-10T15:40:40+5:302021-08-10T15:43:18+5:30

ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ३० सेकंदाची जाहिरात पाहून लोक हैराण झाले आहेत.

Woman stands on top of Burj Khalifa in emirates airline ad see viral video how it was filmed | बाप रे बाप! बुर्ज खलिफाच्या टॉपवर उभं राहून महिलेने शूट केली जाहिरात, व्हिडीओ पाहून उडेल थरकाप

बाप रे बाप! बुर्ज खलिफाच्या टॉपवर उभं राहून महिलेने शूट केली जाहिरात, व्हिडीओ पाहून उडेल थरकाप

Next

जगातल्या सर्वात उंच इमारतीच्या लिस्टमध्ये दुबईच्या बुर्ज खलिपाचा नंबर लागतो. या इमारतीच्या टॉपवर उभं राहणं फारच बहादुरीचं काम आहे. अशात अमीरात, जी संयुक्त अरब अमीरातीतील सर्वात मोठी एअरलाइन आहे. त्यांनी दुबईत बुर्ज खलिफाच्या टॉपवर उभं राहून एका महिलेने केलेली जाहिरात रिलीज केली आहे. ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ३० सेकंदाची जाहिरात पाहून लोक हैराण झाले आहेत.

निकोल-स्मित लुडविक जी एक ट्रेन स्कायडायविंग प्रशिक्षक आहे. ती या जाहिरातीत बुर्ज खलिफाच्या टॉपवर उभी आहे. जाहिरात सुरू होते तेव्हा ती एअरलाईन्सबाबत काही बोर्ड्स दाखवते. जेव्हा कॅमेरा झूम आउट होतो तेव्हा दिसतं की, ती बुर्ज खलिफाच्या टॉपवर  उभी आहे. बॅकग्राउंडला दुबईचा शानदार नजारा दिसतो. जमिनीपासून ८२८ मीटर वर बुर्ज खलिफा जगातली सर्वात उंच इमारत आहे. (हे पण वाचा : VIDEO : भर रस्त्यात गाडीवर कपल करत होतं अश्लील चाळे, लोकांनी अडवलं आणि मग.....)

निकोलने ही जाहिरात इन्स्टाग्रामवर शेअऱ करत लिहिले की, 'हा माझ्याकडून करण्यात आलेला सर्वात आश्चर्यजनक आणि रोमांचक स्टंट्सपैकी एक आहे. तुमच्या क्रिएटिव्ह आयडियासाठी अमीरात एअरलाइन्स टीमचा भाग होऊन आनंद झाला'.

ही जाहिरात पाहून लोक अवाक् झाले आहेत. लोक भरभरून या व्हिडीओवर कमेंट्स करत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला १ लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 
 

Web Title: Woman stands on top of Burj Khalifa in emirates airline ad see viral video how it was filmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.