धक्कादायक! महिलेच्या पोटात दुखू लागलं, रुग्णालयात पोहोचली; तपासणीत झाला मोठा खुलासा, डॉक्टरही झाले आवाक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 04:46 PM2023-04-26T16:46:22+5:302023-04-26T16:47:04+5:30
काही महिन्यांपासून महिलेच्या पोटात वेदना होत होत्या, पण महिला औषध खात होती. या हलगर्जीपणामुळे वेदना वाढल्या.
एखाद्या वेदनेकडे आपण जास्त दिवस दुर्लक्ष केलं तर त्याचे परिणाम काय होतात हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे वेळीच डॉक्टरांच्याकडे जात त्याचे निदान केले पाहिजेत. सध्या असंच एक प्रकरण समोर आलं आहे. गेल्या ११ वर्षापासून एका महिलेच्या पोटात वेदना होतं होत्या. वेदना वाढल्या की ती वेदनाशामक औषधे घेत असे. मात्र या निष्काळजीपणामुळे त्या महिलेची पोटदुखी वाढल्या. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांनी त्याचा एमआरआय केला. एमआरआयमध्ये जे दिसले ते पाहून महिलेसह डॉक्टरही हैराण झाले.
'गाऊ नको किसना' सातासमुद्रापार, टाईम्स स्क्वेअरसमोरचा भारतीय तरुणीचा डान्स व्हायरल
एका अहवालानुसार,हे प्रकरण कोलंबियाचे आहे. जिथे मारिया एडेरलिंडा फोरिओ नावाच्या ३९ वर्षीय महिलेच्या पोटातून सुई आणि धागा बाहेर आला आहे. गेल्या ११ वर्षांपासून त्यांना पोटात दुखत होते. पण नुकतीच जेव्हा त्यांची चाचणी केली तेव्हा असे आढळून आले की, या दुखण्याचे कारण त्यांच्या पोटात असलेली सुई आणि धागा आहे. सध्या डॉक्टरांनी ऑपरेशन करून ते काढले आहे.
महिलेने सांगितले की, सुरुवातीला ती पोटातील दुखणे सामान्य मानत होती, पण जेव्हा हे दुखणे सहन होत नव्हते तेव्हा ती डॉक्टरकडे गेली. त्याचा एमआरआय येथे केला असता त्याच्या पोटात सुई व धागा असल्याचे आढळून आले.
४ मुलांच्या जन्मानंतर ऑपरेशन करण्यात आले, मात्र ऑपरेशननंतर पोटात दुखू लागले. कधी कमी, कधी जास्त. सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांनी औषधे देऊन वेदना नियंत्रित केल्या, परंतु पूर्ण वेळ विश्रांती मिळू शकली नाही.
"कधीकधी पोटात दुखणे इतके तीव्र होते की रात्रभर झोपू शकत नव्हते. तब्बल ११ वर्षे तिने याचा सामना केला. शेवटी त्यांनी अल्ट्रासाऊंड आणि एमआरआय केले तेव्हा खरे कारण समजले.रिपोर्टनुसार जेव्हा मारियाचे फॅलोपियन ट्यूब ऑपरेशन झाले तेव्हा डॉक्टरांनी चुकून ही सुई आणि धागा तिच्या पोटात सोडला होता. यामुळे वर्षानुवर्षे तिला वेदना होत होत्या. या क्षणी, ते आता काढून टाकण्यात आले आहे आणि मारिया सामान्य जीवनाचा आनंद घेत आहे.