37000 फूट उंचीवर महिलेने विमानाचा दरवाजा उघडला, म्हणाली - देवाचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 06:45 PM2022-11-30T18:45:28+5:302022-11-30T18:45:36+5:30
अमेरिकेतील फ्लाइटमध्ये बसलेल्या एका महिला प्रवाशाने फ्लाइट 37,000 फूट उंचीवर विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.
अमेरिकेतील फ्लाइटमध्ये बसलेल्या एका महिला प्रवाशाने फ्लाइट 37,000 फूट उंचीवर विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. हे करण्याआधीच एका प्रवाशाने त्या महिलेला थांबवले. यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करून महिलेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी पोलिसांसमोर या महिलेने देवाने असं करण्यास सांगितल्याचे सांगितले. 34 वर्षीय अलोम एग्बेग्निनाऊ ह्यूस्टन, टेक्सास येथून कोलंबस, ओहायोला जाणाऱ्या साउथवेस्ट एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये बसली होती. ती अचानक जागेवरून उठली आणि दरवाजापाशी जाऊन ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागली. यावेळी दारावर डोकं आपटत होती की येशूने तिला ओहायोला जाण्यास सांगितले आहे आणि आता दरवाजा उघडण्यास सांगत आहे, असं ती ओरडू लागली.
रडणाऱ्या ताईला पाहून कासाविस झालाय चिमुकला, बघा तिला कसं समजावतोय... व्हायरल इमोशनल व्हिडिओ
महिलेचे हे कृत्य पाहून विमानातील इतर प्रवासी घाबरले. मोठा अनर्थ घडू शकतो अस त्यांच्या लक्षात येताच काही प्रवाशांनी महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला, यावेळी तिने एका प्रवाशाला अडवले. विमानाचे अर्कान्सासमधील बिल आणि हिलरी क्लिंटन राष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यानंतर क्रू मेंबर्सनी महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले.
सोमवारी, पूर्व डिस्ट्रिक्ट ऑफ अर्कान्साससाठी जिल्हा न्यायालयाकडून एक निवेदन जारी केले आहे. यात ती महिला वेडसर असल्याचे म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकरणावर महिला म्हणाली, मी खूप दिवसांपासून प्रवास केला नाही आणि मी खूप काळजीत होते. मी शनिवारी माझ्या पतीला न सांगता आणि मेरीलँडमधील कौटुंबिक मित्राला भेटण्यासाठी कोणत्याही बॅगशिवाय घर सोडले. सहसा मी अशा गोष्टी अजिबात करत नाही. विमानात महिलेवर प्राणघातक हल्ला आणि क्रू मेंबर्ससोबत हाणामारी केल्याप्रकरणी तपास सुरू आहे.