Video : तरूणीने सुपरमार्केटमध्ये केली 'गंदी बात', सीसीटीव्हीमध्ये कैद झाला कारनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 03:52 PM2019-08-08T15:52:20+5:302019-08-08T16:03:46+5:30
हा विचित्रपणा करताना तिला कुणीच पाहिलं नाही, असं तिला वाटलं होतं. पण नंतर सीसीटीव्ही फुटेजमुळे तिचा भांडाफोड झाला.
अमेरिकेतील पेन्सिलवेनियामध्ये एक विचित्र आणि लाजिरवाणी घटना समोर आली आहे. इथे एका सुपरमार्केटमध्ये तरूणी विक्रीसाठी बाजूला ठेवलेल्या बटाट्यांवर लघुशंका करताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. जेव्हा हे प्रकरण पोलिसात गेलं तेव्हा तरूणीने पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं. ही घटना २४ जुलैला घडली होती.
झालं असं की, तरूणीने सुपरमार्केटमध्ये ठेवलेल्या बटाट्यांवर लघुशंका केली आणि हळूच तेथून निघून गेली. त्यावेळी तिला कुणीच पाहिले नाही. पण नंतर सफाई कर्मचाऱ्याला आढळलं की, बटाट्यांवर कुणीतरी लघवी करून गेलंय. ही बाब त्याने लगेच स्टोर मॅनेजरला सांगितली.
(Image Credit : www.independent.co.uk)
नंतर मॅनेजरने सीसीटीव्ही फुटेज चेक केलं आणि त्यांना आढळलं की, एका तरुणीने सुपरमार्केटमध्ये ठेवलेल्या बटाट्यांवर लघवी केली. मॅनेजरने पोलिसांकडे तक्रार केली आणि पोलिसांनी चौकशी सुरू केली. अशात नंतर तरूणीने पोलीस स्टेशनमध्ये येऊन आत्मसमर्पण केलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी तरुणीचं नाव ग्रेस ब्राउन(२०) आहे. पोलिसांनी सांगितले की, या घटनेवेळी तरूणी नशेत होती. त्यामुळे या तरूणीवर वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
तर सुपरमार्केटच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या घटनेच्या खुलाशानंतर ते बटाटे स्टोरमधून हटवण्यात आले आहेत. सोबतच त्याजागी दुसरे बटाटे ठेवण्यात आले आहेत.