Video : काय सांगता राव? व्यायाम करता करता दळले जाताहेत गहू; पाहा 'हा' देशी जुगाड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 01:47 PM2020-09-24T13:47:09+5:302020-09-24T13:56:18+5:30

लॉकडाऊन दरम्यान अनेक ठिकाणं बंद होती. त्यामुळे कोणी केस कापण्यासाठी जुगाड केला तर कोणी घर काम करण्यासाठी. अशा वेगवेगळ्या प्रसंगांनी अनेकांना खळखळून हसवलं. 

Woman using gym cycle to grind flour while exercising video goes viral | Video : काय सांगता राव? व्यायाम करता करता दळले जाताहेत गहू; पाहा 'हा' देशी जुगाड

Video : काय सांगता राव? व्यायाम करता करता दळले जाताहेत गहू; पाहा 'हा' देशी जुगाड

googlenewsNext

इतर देशांच्या तुलनेत भारतात तुम्हाला देशी जुगाड खूप पाहायला मिळतील. अनेकदा या जुगाडांमध्येही खूप कलात्मकता वापरलेली असते, तर कधी भन्नाट विनोद. कोरोना काळात सध्या एका देशी जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेक ठिकाणं बंद होती. त्यामुळे कोणी केस कापण्यासाठी जुगाड केला तर कोणी घर काम करण्यासाठी. अशा वेगवेगळ्या प्रसंगांनी अनेकांना खळखळून हसवलं. 

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता घरच्याघरी गहू दळण्यासाठी देशी जुगाड केला आहे. तुम्ही पाहू शकता एक महिला  जीमच्या सायकलने म्हणजेच कार्डीओसाठी वापरात असलेल्या सायकलचा वापर करून गहू दळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ  शेअर करताना अवनीश शरण यांनी कॅप्शन दिलं आहे की,  कमाल अविष्कर आहे. काम आणि व्यायाम दोन्ही एकत्र होत आहे. 

या व्हिडीओमधील छोटीशी जीम तुम्ही घरीही आणू शकता. व्यायाम शरीरासाठी महत्वाचा आहे. त्याचसोबत घरची कामही महत्वाची असतात. या यंत्राचा वापर करून तुम्ही एकत्र दोन्ही कामं करू शकता. या जिम सायकलमध्ये धान्य दळण्याची सिस्टीम तयार करण्यात आली आहे. त्यामुळे जशी सायकल चालवायला सुरूवात होते तसं गहू दळले जात आहेत. या सायकलच्या पुढे एक भांडसुद्धा बसवण्यात आलं आहे. या भांड्यात  दळलं  जाणारं पीठ एकत्र होत आहे. 

हे पण वाचा-

अरे व्वा! केळ्याचा कचरा ठरला उत्पन्नाचं साधन; हजारो महिलांना 'असा' मिळाला रोजगार

Video : भूकेलेल्या खारूताईचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल; 'याला म्हणतात माणुसकी'

काय सांगता! थेट बैलाला डबलसीट घेऊन प्रवासाला निघाला 'हा' पठ्ठ्या; पाहा व्हायरल व्हिडीओ

Web Title: Woman using gym cycle to grind flour while exercising video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.