धक्कादायक! महिला वेटर ग्राहकांच्या ड्रिंकमध्ये , स्वत:च रक्त मिसळायची, रंगेहात पकडल्यानंतर कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 01:26 PM2023-04-18T13:26:52+5:302023-04-18T13:27:54+5:30

एक महिला वेटर ग्राहकांच्या ड्रिंकमध्ये स्वत:च रक्त मिसळत असल्याची घटना समोर आली आहे.

woman waiter sacked after mix her blood in customers drinks in cafe | धक्कादायक! महिला वेटर ग्राहकांच्या ड्रिंकमध्ये , स्वत:च रक्त मिसळायची, रंगेहात पकडल्यानंतर कारण आलं समोर

धक्कादायक! महिला वेटर ग्राहकांच्या ड्रिंकमध्ये , स्वत:च रक्त मिसळायची, रंगेहात पकडल्यानंतर कारण आलं समोर

googlenewsNext

एका रेस्टॉरंटमधून धक्कादायक माहिती उघडं झाली आहे. एक महिला वेटर ग्राहकांच्या ड्रिंकमध्ये स्वत:चे रक्त मिसळत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता कारवाई करण्यात आली  आहे. महिलेला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. 

Brain Teaser to Test Your IQ : या फोटोत आहे एक चूक, समोर असूनही दिसत नाही; लगेच शोधा...

ही घटना जपान मधील आहे. जपानमधील एका कॅफेमधील वेट्रेसने ग्राहकांच्या कॉकटेल ड्रिंकमध्ये तिचे रक्त मिसळल्याचे आढळून आल्याने तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. मोंडाईजी कॉन कॅफे डाकू नावाच्या कॅफेमध्ये ही घटना घडली आहे. महिला वेटरविरोधात तक्रार आल्यानंतर कॅफेने तिच्यावर कारवाई केली आहे. ग्राहकांच्या पेयांमध्ये फळे आणि रंगीत सिरपमध्ये ती तिचे रक्त मिसळत असल्याचे समोर आले.  महिला वेटरच्या या कृतीमुळे कॅफेला दिवसभर काम बंद करावे लागले. महिला वेटरनेही या कृत्याचे कारण उघड केले आहे.

मोंडाईजी कॉन कॅफेने आपल्या महिला वेटरला अस चुकीचे काम केल्याबद्दल काढून टाकले आहे. महिला वेटरवर ग्राहकांच्या पेयांमध्ये रक्त मिसळल्याचा आरोप आहे. एका ट्विटमध्ये कॅफेने ही घटना नोकरीच्या दहशतवादापेक्षा कमी नसल्याचे म्हटले आहे. कॅफेच्या संचालकांनी महिला वेटरची ओळख गुप्त ठेवली जात असल्याचे सांगितले. ती वेगळी दिसत होती. तिने अनेकदा गडद आणि अतिशय तेजस्वी कपडे परिधान केले. ग्राहकांच्या ड्रिंक्समध्ये फळे, रंगीत सरबत यांचे रक्त ती मिसळत असे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, असे पेय प्यायल्याने तुम्हाला एचआयव्ही आणि हेपेटायटीससारख्या गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो. असे काम करणाऱ्या महिलेला डॉक्टरांनी मानसिक आजारी म्हटले आहे.

या महिलेने रक्त मिसळण्याचे कारणही सांगितले आहे. या महिलेने आपला गुन्हा कबुल केला आहे. एका ग्राहकाच्या सांगण्यावरून असे काम केल्याचे तिने सांगितले आहे.  ग्राहक त्याला त्यांच्या पेयांमध्ये रक्त मिसळण्यास सांगायचे. पण,  एक-दोन घटनांनंतर महिलेने असे प्रकार अधिकच करण्यास सुरुवात केली. आता या महिलेविरोधात कारवाई केली आहे. 

Web Title: woman waiter sacked after mix her blood in customers drinks in cafe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.